जेवणांत सगळ्यांचं चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच तिखट, भरपूर तेलाचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. पण सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे ऍसिडिटी वाढून पचनाच्या गंभीर समस्या निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कमीत कमी तेलाचा वापर करून तुम्ही कोणत्या भाज्या बनवू शकता, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाज्या चवीसोबत शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आहेत. (फोटो सौजन्य – istock)
        कमीत कमी तेल आणि मसाल्यांचा वापर करून बनवा 'या' चविष्ट भाज्या

भोपळ्याच्या भाजीमध्ये खूप जास्त पाणी असते, त्यामुळे या भाजीसाठी जास्त मसाला किंवा तेल लागत नाही. फायबर युक्त गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या भाजीचे सेवन केल्यास पचनक्रिया मजबूत राहील.

पालक पनीर, पालक भाजी इत्यादीं अनेक वेगवेगळे प्रकार बनवले जातात. पालकच्या भाजीचे सेवन केल्यास शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि रक्ताची कमतरता भरून निघते.

लहान मुलांना भेंडीची भाजी खायला खूप जास्त आवडते. भेंडीच्या भाजीमधील घटकांमुळे आरोग्य सुधारते. याशिवाय भाजीला खूप तेल आणि मसाले लागतात.

कोबीच्या भाजीला खूप जास्त मसाल्यांची आवश्यकता नसते. हिरवी मिरची आणि ओल्या खोबऱ्यात बनवलेली चवदार भाजी सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

दुधी भोपळ्याचा रस प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या भाजीमध्ये भरपूर पाणी असते, ज्यामुळे भाजी बनवताना खूप कमी प्रमाणात तेल लागते. दुधीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते, पोटात थंडावा टिकून राहतो.






