लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांच्या दिवशी गळ्यात सोन्याचे मोठे मंगळसूत्र घातले जाते. याशिवाय एप्रिल मे महिना लग्नसराईचा महिना. या महिन्यांमध्ये लग्नाचे मुहूर्त नेहमीच असतात. लग्न म्हंटल की दोन ते तीन महिने आधीपासून तयारी सुरु केली जाते. सोन्याचे दागिने, साड्या आणि इतर वस्तूंची खरेदी आधीच केली जाते. मात्र लग्नात नवरीला कोणत्या डिझाईन्सचे मंगळसूत्र घ्यावे? असा अनेकदा प्रश्न मनात निर्माण होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोन्याच्या मंगळसूत्रांच्या काही सुंदर डिझाईन्स दाखवणार आहोत. या डिझाईन्स मंगळसूत्र तुम्ही कोणत्याही सणाच्या दिवशी किंवा इतर वेळी घालू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
'या' डिझाईन्सचे मंगळसूत्र गळ्यात दिसतील उठावदार आणि आकर्षक
साऊथ इंडियन लग्नांमध्ये नवरीच्या गळ्यात या पद्धतीचे मंगळसूत्र घातले जातात. सोन्याच्या चैनीमध्ये दोन सुंदर वाट्या घालून हे मंगळसूत्र बनवले जाते.
जास्त सोन्याचा वापरून तयार केलेले सोन्याचे मंगळसूत्र गळ्यात उठून दिसतात. यामध्ये तुम्ही फॅन्सी पेंडेंट सुद्धा लावून घेऊ शकता.
अनेक मुलींना खूप नाजूक साजूक आणि भरपूर काळे मणी असलेले मंगळसूत्र घालायला खूप आवडतं. त्यामुळे रोजच्या वापरासाठी किंवा लग्नसराईत घालण्यासाठी या डिझाईन्सच्या मंगळसूत्राची निवड करू शकता.
मोराची डिझाईन असलेले सोन्याचे दागिने अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. या डिझाइन्सचे मंगळसूत्र तुम्ही लग्नात नवरीला घालू शकता.
साडी नेसल्यानंतर किंवा कोणताही ड्रेस परिधान केल्यानंतर या डिझाईन्सचे मंगळसूत्र गळ्यात अतिशय सुंदर दिसेल. हल्ली गेरू फिनिशिंग असलेले सोन्याचे दागिने ट्रेंडिंगला आहेत.