अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. आजच्या दिवशी फळांचा राजा असलेल्या आंबा फळाला विशेष स्थान आहे. त्याचबरोबर सोने खरेदीवर देखील भर दिला जातो. पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीला आंब्याची खास आरास करण्यात आली आहे. (फोटो -टीम नवराष्ट्र)
Dagdusheth Halwai Ganpati Temple Pune Mango Festival 2025

अक्षय तृतीयाच्या निमित्ताने पुण्यातील आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला तब्बल ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.

गणरायाच्या मुर्तीभोवती आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. ही सुंदर आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई यांच्याकडून महानैवैद्य देण्यात आला आहे.

गाभाऱ्यासह संपूर्ण मंदिरामध्ये आंब्याचे डेकोरेशन करण्यात आले आहे. त्याचबोरबर मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती लावण्यात आली आहे.

प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली.






