बॉलीवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत दिवाळी थाटामाटात सगळीकडे सुरु झाली आहे. दिवाळी सारखा पवित्र सण जवळ आला आहे. यावर्षी दिवाळी २० ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. बॉलीवूड स्टार्सनी आधीच आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री मनीष मल्होत्राने दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते, जिथे करीना कपूर खानपासून चित्रांगदा सिंगपर्यंत सर्वजण या पार्टीत सहभागी होताना दिसले. सगळ्यांचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत चमकले बॉलीवूड सितारे (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नीता अंबानी देखील त्यांची धाकटी सून राधिका मर्चंटसोबत या पार्टीत सहभागी झाल्या. दोघींचा लूक देखील पाहण्यासारखा होता.
बॉबी देओल आणि प्रीती झिंटा २६ वर्षांनी एकत्र दिसले. त्यांनी पार्टीत एकत्र पोझ दिले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी तान्या देओल देखील दिसली.
दिवाळी पार्टीत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे आणखी एक जोडी म्हणजे वीर पहाडिया आणि तारा सुतारिया. गेल्या काही काळापासून त्यांच्या अफेअरच्या अफवा पसरत आहेत. आणि त्यांना या पार्टीत एकत्र बघून चाहते खुश झाले आहेत.
सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे ‘गेहरियां’ आणि ‘कहां खो गये हम’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खूपच आकर्षक होती. या पार्टीत देखील ते एकत्र पोहचले.
मनीष मल्होत्राच्या पार्टीत सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल देखील उपस्थित होते. त्यांनी कॅमेऱ्यांसमोर एकत्र पोझ दिले. सोनाक्षीने यावेळी निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, तर झहीरने काळा कुर्ता परिधान केला होता.
मनीष मल्होत्राच्या पार्टीत आयुष्मान खुराना आणि अपारशक्ती खुराना त्यांच्या पत्नींसोबत पोझ देताना दिसले. खुराना कुटुंब पारंपारिक पोशाखात एकत्र दिसले, ते खूपच सुंदर दिसत होते.
बॉलीवूडचे आवडते जोडपे, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे एक पॉवर कपल आहेत. या दोन्ही स्टार्सना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी एक मेजवानी आहे. आणि आता, ते मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले.
मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत करीना कपूर खाननेही तिचा जबरदस्त लूक दाखवला. पांढऱ्या पारंपारिक पोशाखात ती एखाद्या स्वर्गीय अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हती.