पोटात गच्च भरलेला गॅस कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अपचन होते. आहारात होणारे बदल, मानसिक तणाव, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीराच्या पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे वारंवार ऍसिडिटी होणे, पोटात दुखणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, पोट जड झाल्यासारखे वाटणे, उलट्या, मळमळ इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर शरीराच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. शरीराची पचनक्रिया पूर्णपणे मंदावते. कोणत्याही वेळी तिखट तेलकट पदार्थ खाल्यामुळे अपचन होते. काहींना जेवणानंतर लगेच झोपण्याची सवय असते.पण यामुळे खाल्ले अन्नपदार्थ पचन होण्याऐवजी शरीरात तसेच जमा होऊन जातात. त्यामुळे जेवणानंतर लगेच झोपू नये.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात विषारी घटक दीर्घकाळ तसेच साचून राहिल्यामुळे लिव्हर आणि किडनीच्या कार्यावर अडथळे निर्माण करतात. यामुळे अन्नपदार्थ पचन होण्यास अडथळे निर्माण होणे, शरीराला सूज येणे, जेवणाची इच्छा कमी होणे इत्यादी गंभीर लक्षणे शरीरात दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे नियमित सेवन केल्यास पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच ब्लोटिंग कमी होऊन आराम मिळेल.
सकाळच्या नाश्त्यात नियमित पपई खावी. पपईमध्ये पपेन नावाचं एन्झाइम असते, ज्यामुळे प्रथिनांचे विघटन सहज होते आणि अन्नपदार्थ पचन होतात. जेवणानंतर किंवा सकाळच्या नाश्त्यात पपई खाल्ल्यास आतड्यांमधील हालचाल सुलभ राहील. पोटात वाढलेला गॅस, बद्धकोष्ठता, विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी पपई गुणकारी आहे. उष्ण वातावरणात पपई खाल्ल्यास पोटात थंडावा निर्माण होतो.
प्रत्येक स्वयंपाक घरात बडीशेप असतेच. जेवणानंतर अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि आरोग्य सुधारते. नियमित अर्धा चमचा बडीशेप चघळून खाल्ल्यास पोटात वाढलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर स्वच्छ होईल. डीशेपमधील तेल पचनसंस्थेच्या स्नायूंना रिलॅक्स करतात, ज्यामुळे वायू तयार होत नाही. तसेच सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात बडीशेप उकळवून पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील.
घरात पुलाव किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवल्यानंतर काकडी आणून खाल्ली जाते. काकडी खाल्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीराला अनेक फायदे होतात. काकडीमध्ये भरपूर पाणी असते, ज्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघते. यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे आतड्याना आलेली सूज कमी होते आणि आरोग्य सुधारते.
पोट फुगण्याची सामान्य कारणे:
पचनसंस्थेत जास्त गॅस जमा झाल्यामुळे.बद्धकोष्ठतेमुळे पोट जड आणि फुगलेले वाटू शकते.एकाच वेळी जास्त खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते.
पचन म्हणजे काय?
पचन म्हणजे अन्न आणि पेये यांना शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेमध्ये अन्न पचवणाऱ्या अवयवांचा समावेश होतो.
पचन सुधारण्यासाठी काय करावे?
तोंडातूनच पचन प्रक्रिया सुरू होते, म्हणून अन्न चांगले चावून खा.जेवण वगळणे टाळा आणि नियमित अंतराने जेवण करा. जेवणानंतर हलके चालल्यासारखे व्यायाम पचन सुधारू शकतात.