दिवाळी सणाला अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. घरातील साफ सफाई झाल्यानंतर फराळ आणि गोड पदार्थ बनवले जातात. फराळातील पदार्थांमध्ये लाडू, करंजी, चकल्या, शेव, शंकरपाळी इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण कायमच फराळात तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दिवाळीत फराळाव्यतिरिक्त कोणते पदार्थ तुम्ही बनवू शकता, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ घरी आलेल्या पाहुण्यांना खूप जास्त आवडतील. (फोटो सौजन्य – istock)
यंदाच्या दिवाळीत फराळाव्यतिरिक्त बनवा 'हे' चविष्ट पदार्थ
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात. त्यामुळे दिवाळीनिमित्त तुम्ही साखरेचा वापर न करता चॉकलेट बर्फी बनवू शकता. सुका मेवा टाकून बनवलेली चॉकलेट बर्फी चवीला अतिशय सुंदर लागते.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात रताळी उपलब्ध असतात. रताळ्यांपासून तुम्ही हलवा बनवू शकता. घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी रताळ्याचा हलवा अतिशय उत्तम आहे. रताळ्यांमध्ये विटामिन ए आणि फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
कायमच दिवाळीनिमित्त घरात बेसन किंवा रव्याचे लाडू बनवले जातात. पण त्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे लाडू बनवू शकता. खोबऱ्याचे लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात.
देशभरात सगळीकडे कडक ऊन पडत आहे. उन्हातून घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही किवी पुदिना कुलर बनवू शकता. पुदिन्याचे सेवन केल्यामुळे पोटात थंडावा वाढतो आणि शरीराला अनेक फायदे होतात.
सुका मेवापासून बनवलेली बर्फी चवीला खूप सुंदर लागते. रोजच्या आहारात सुद्धा तुम्ही सुका मेवा बर्फी खाऊ शकता. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील.