स्वामी विवेकानंदांच्या शिष्या समाजसेविका भगिनी निवेदिता यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मूळच्या भारतीय नसून भारताच्या समाजासाठी पूर्ण जीवन समाजकार्य करणाऱ्या भगिनी निवेदिता यांची आज पुण्यतिथी. भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट नोबल असे होते. या स्वामी विवेकानंदांच्या आयरिश शिष्या होत्या, ज्यांनी शिक्षण, समाजसेवा आणि भारतीय संस्कृतीच्या प्रचारासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी कोलकाता येथे मुलींसाठी शाळा उघडली आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्येही योगदान दिले. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा दिली आणि ‘निवेदिता’ हे नाव दिले, ज्याचा अर्थ “देवाला समर्पित” असा होतो. स्वामी विवेकानंद यांच्या निधनानंतर त्या श्री अरबिंदो यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एक बनल्या.
13 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
54ई.पूर्व : 17 व्या वर्षी ‘निरो’ – रोमन सम्राट झाला.
1773 : चार्ल्स मेसियरने व्हर्लपूल गॅलेक्सी शोधली.
1884 : ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त हे शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
1923 : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलहून अंकारा येथे हलवली.
1929 : पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांसाठी खुले करण्यात आले.
1944 : दुसरे महायुद्ध – रेड आर्मीने लॅटव्हियाची राजधानी रिगा ताब्यात घेतली.
1946 : फ्रान्सने नवीन संविधान स्वीकारले.
1970 : फिजीचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
1976 : इबोला विषाणूचा पहिला इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ डॉ. एफ. ए. मर्फी यांनी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांवर घेतला.
1983 : अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिले सेल्युलर नेटवर्क लाँच केले.
2016 : मालदीवने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
2019 : केनियाच्या ब्रिगिड कोसगेईने, शिकागो मॅरेथॉनमध्ये 2 :14 :04 वेळेत महिला धावपटूसाठी नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
13 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
13 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष