मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता कोळी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती गेल्या १३ वर्षांपासून तिच्या वृषांक खनाल या नेपाळी बॉयफ्रेंडला डेट करत होती. आता हे नाते नवरा बायकोच्या नात्यात बदलणार आहे. लवकरच नेपाळला मराठमोळी सून मिळणार आहे. प्राजक्ताने या लग्न सराईचे फोटोज आणि व्हिडीओज तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत.
प्राजक्ता-वृषांकचा पार पडला मेहंदी सोहळा. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनाल यांचा विवाह २५ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. प्राजक्ताच्या घरात लग्नसराईला सुरुवात झाली आहे.
आज प्राजक्ताचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अर्थातच सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
मेहंदीच्या कार्यक्रमात दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांच्या चेहऱ्याचे तेज वाढवण्याचा काम करता होता. मेहंदीने सजलेल्या हाताने दोघांनी छान असे फोटोज टिपले आहेत.
चाहत्यांनी दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक तारे सितारे मंडळींनीही दोघांना धुभेच्छा देतं शुभाशीर्वाद दिले आहेत.
प्राजक्ता ‘मिसमॅच्ड’ नावाच्या वेब सिरीजमध्ये दिसली आहे. त्या सीरिजचा तिसरा सीझन डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित झाला.