Mumbai-PCMC Municipal Election 2026: महायुतीत असूनही अजित पवारांची भाजपविरोधी लढत; पिंपरीत प्रतिष्ठा पणाला
भाजपच्या हातून परळी निसटली? पंकजा मुंडेंच्या ‘या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत (PCMC) ३२ वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डमधून चार नगरसेवक निवडून येतील. परिणामी, एकूण नगरसेवकांची संख्या १२८ इतकी आहे. राजकीय पक्ष प्रत्येक प्रभागासाठी चार उमेदवारांचे पॅनेल उभे करतात. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) निवडणुकीत ४४ जागांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. २०२६ च्या पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठी एकूण ६९२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपचे दोन उमेदवार, रवी लांडगे आणि सुप्रिया चांदगुडे हे बिनविरोध निवडून आले. पिंपरी चिंचवड निवडणूक देखील महत्त्वाची बनली आहे कारण अजित पवार यांनी या महापालिकेचा उल्लेख करून भाजपवर हल्ला केला होता, ज्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचा आरोप केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीमधील तणाव वाढला. या आरोपांना प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधत, ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप करणारेच आज आमचे युतीतील भागीदार असल्याचे विधान केले. दोष सिद्ध होईपर्यंत कोणीही गुन्हेगार ठरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार
पवारांचे हे वक्तव्य भाजपवर पलटवार म्हणून पाहिले गेले. यावर महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपसाठीच आहे का, असा सवाल उपस्थित केला. तसेच, “आम्ही बोलायला लागलो तर त्यांना खूप त्रास होईल,” असा इशाराही दिला. दरम्यान, अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत, याचे पुरावे असल्याचे सांगितले. या आरोप-प्रत्यारोपांमुळे भाजप आणि राष्ट्रवादीतील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला असून पिंपरी-चिंचवडची निवडणूक लढाई हाय-व्होल्टेज बनली आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद पवार गटाशी युती करून पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका निवडणुका लढवत आहे. पुण्यात पवारांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यातील आपला बालेकिल्ला जपण्यावर आणि महानगरपालिकांमध्ये पुन्हा सत्तेत येण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, तर भाजप पिंपरी-चिंचवड युनिटचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले की, “ही निवडणूक प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात आहे हे खरे आहे. ही भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात थेट लढत असेल. परंतु आम्हाला राष्ट्रवादीला पराभूत करण्याचा विश्वास आहे. तर ” राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड नेते योगेश बहल म्हणाले, “ती थेट लढत असो किंवा बहुपक्षीय लढत असो, आम्हाला भाजप उमेदवारांना पराभूत करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२०१७ ते २०२२ पर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सत्तेत होता. २०१७ च्या निवडणुकीत पक्षाने १२८ सदस्यांच्या सभागृहात ७८ नगरसेवक जिंकून प्रचंड विजय मिळवला. यामुळे राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर काढण्यात आले. यापूर्वी, राष्ट्रवादीने २५ वर्षे नगरपालिका संस्थेवर राज्य केले होते. आता, राष्ट्रवादी भाजपला सत्तेतून बाहेर काढून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ४४ जागांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत असताना, नवाब मलिक हे मुंबईत भाजपमधील तणाव वाढवत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा किंगमेकर असल्याचा दावा केला आहे.






