मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे मेंदू. शरीरात होणारे बदल, दैनंदिन जीवन किंवा आरोग्यासंबंधित इतरही गोष्टीचे कार्य सुधारण्यासाठी मेंदू तीक्ष्ण असणे आवश्यक आहे. बऱ्याचदा अनेक लोक सांगितलेल्या गोष्टी लगेच विसरून जातात. मेंदूच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मेंदूची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तसेच शरीराला पोषण मिळते. (फोटो सौजन्य – iStock)
मेंदूमध्ये झपाट्याने वाढेल स्मरणशक्ती! रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचे नियमित सेवन
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, लोह, जस्त आणि तांबे इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे नाश्त्यात किंवा इतर वेळी तुम्ही भोपळ्याच्या बियांचे सेवन करू शकता.
सकाळी उठल्यानंतर नियमित एक किंवा दोन अंडी खावी. अंडी खाल्यामुळे शरीराला पोषण मिळते. अंड्यांमध्ये असलेले 'कोलीन' नावाचा घटक मेंदूचा विकास करण्यासाठी प्रभावी आहे.
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले गुणधर्म शरीरासह मेंदूसाठी सुद्धा प्रभावी ठरतात. मेंदूतील डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोन्स वाढवण्यासाठी हळदीचा वापर करावा.
ब्लूबेरीला 'ब्रेन बेरी' असे सुद्धा म्हंटले जाते. ब्लूबेरीचे सेवन केल्यामुळे शरीराला विटामिन सी आणि इतर पोषक घटक मिळतात. ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स मेंदूचे कार्य वाढवतात आणि वाढत्या वयानुसार कमी होत चालले स्मृती सुधारण्यासाठी मदत करतात.
दैनंदिन आहारात नियमित एक किंवा दोन भिजवलेले अक्रोड खावेत. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन ई इत्यादी अनेक घटक आढळून येतात. अक्रोड खाल्यामुळे मेंदूच्या पेशी मजबूत होण्यास मदत होते.