Milk Tea Side Effects On Kidney 5 Major Problems May Occur
किडनी स्टोनपासून ते लोहाच्या कमतरतेपर्यंत, जास्त दुधाच्या चहामुळे 5 मोठे नुकसान
Milk Tea Side Effects: आपल्या देशात दुधाचा चहा हे लोकप्रिय पेय म्हणून पाहिले जाते. दिवसाच्या सुरुवातीपासून ते संध्याकाळी थकवा दूर करण्यापर्यंत प्रत्येक प्रसंगी एक कप चहा अनेकांना हवाहवासा वाटतो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की रोज जास्त प्रमाणात दुधाचा चहा पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते? होय, दुधासोबत चहाचे जास्त सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे (फोटो सौजन्य - iStock)
दुधाच्या चहाचे जास्त सेवन केल्यास पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. दिवसातून योग्य प्रमाणात खरं तर दुधाच्या चहाचे सेवन करावे
Follow Us:
Follow Us:
चहामध्ये असलेले कॅफिन आणि टॅनिनमुळे पोटात अॅसिडिटी होते, ज्यामुळे अॅसिड रिफ्लक्स आणि अपचन होऊ शकते
जर तुम्हाला लैक्टोज असहिष्णुता असेल तर दुधासोबत चहा प्यायल्याने गॅस, डायरिया आणि पोटात दुखणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात
चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला उत्तेजित करते. जास्त प्रमाणात चहा प्यायल्याने निद्रानाश होऊ शकतो. आधीच झोपेशी संबंधित समस्या असलेल्यांनी चहाचे जास्त सेवन करणे अधिक हानिकारक ठरू शकते
दुधाच्या चहामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे किडनी स्टोन तयार होतात. हे किडनीचे फिल्टरिंग फंक्शन कमकुवत करते, ज्यामुळे किडनीशी संबंधित इतर समस्यादेखील उद्भवू शकतात
चहामध्ये टॅनिन नावाची संयुगे आढळतात, ज्यामुळे शरीरातील लोहाचे शोषण कमी होते. विशेषतः जेवल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास लोहाची कमतरता होऊ शकते. ज्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे आणि थकवा येऊ शकतो
दुधाच्या चहाचे जास्त सेवन, विशेषत: जर त्यात भरपूर साखर मिसळली तर, तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो
चहामध्ये असलेले कॅफिन आणि साखर दोन्ही रक्तदाब वाढवू शकतात. यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो
Web Title: Milk tea side effects on kidney 5 major problems may occur