दिवसेंदिवस भाज्यांच्या किंमतीत प्रचंड वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही भाज्यांचे दर तर गगनाला भिडले आहेत. कांदा, बटाटा, टोमॅटो या रोजच्या वापरातील भाज्यांच्या किंमती देखील प्रचंड वाढल्या आहेत. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की लोक भाज्यांच्या किंमतीची तुलना सोन्याच्या भावासोबत करतात. आता आम्ही तुम्हाला अशा भाज्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत खरच सोन्याच्या किंमतीपेक्षा देखील जास्त आहे. (फोटो सौजन्य - Pinterest)
या आहेत जगातील सर्वात महागड्या भाज्या; 1 किलोची किंमत सोन्याहूनही अधिक

तुम्ही कधी अशा भाज्यांबद्दल ऐकलं आहे का की ज्यांची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे? होय, जगातील सर्वात महागड्या भाज्यांच्या किमतीत तुम्ही दोन तोळे सोने खरेदी करू शकता.

युरोपमध्ये आढळणारा पांढरा ट्रफल हा जगातील सर्वात महाग ट्रफल आहे. त्याची किंमत 5 लाख रुपये प्रति किलोपर्यंत आहे. त्याची चव लसूण आणि चीज सारखी असते.

जपानमध्ये आढळणारा मुत्सुताके मशरूम हा जगातील सर्वात महागडा मशरूम आहे. त्याची किंमत 1.5 लाख रुपये प्रति किलोपर्यंत आहे. त्याची चव गोड आणि सुगंधी आहे.

फ्रान्सच्या एका किनाऱ्यावर आढळणारा ला बोनॉट बटाटा ही दुर्मिळ जाती आहे. त्यांची चव थोडी खारट आहे. या बटाट्याची एक किलोची किंमत 1 लाख रुपये आहे .

उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या हॉप शूट्सचा वापर बिअर बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय औषधी बनवण्यासाठीही याचा वापर होतो. त्याची अंदाजे किंमत 73,000 रुपये आहे .

यार्त्सा गुम्बू हा एक प्रकारचा अळी आहे जो तिबेट आणि नेपाळमध्ये आढळतो. याला जगातील सर्वात महाग भाजी देखील म्हटले जाते. त्याची किंमत सोन्याहून अधिक आहे.






