प्रत्येक ठिकाण हे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी फेमस असते. आज मात्र आम्ही तुम्हाला मेक्सिकोतील झोचिमिल्कोमध्ये दडलेले असे एक ठिकाण सांगत आहोत जे आपल्या अलाैकिक शक्तींसाठी जगभरात लोकप्रिय आहे. हे ठिकाण इथले एक बेट असून इस्ला दे लास मुनेकास असे याचे नाव आहे. या बेटाला बाहुल्यांचे बेट असेही संबोधले जाते. आता बाहुल्या म्हटल्या की, आपल्या मनात त्यांच गोंडस रुप येतं मात्र इथे ठेवलेल्या बाहुल्यांना क्यूट समजण्याची चूक करु नका. बेटावरचे दृश्य इतके थराराक आहे की पाहून कुणालाही धडकी भरु शकते. इथे झाडांवर एक नाही, दोन नाही तर शेकडो बाहुल्या वाईटरीत्या लटकवण्यात आल्या आहेत.
रहस्यमयी बेट! कुणाचे हात-पाय नाहीत तर कुणाचे डोळे... झाडांवर टांगल्यात शेकडो बाहुल्या; काय आहे भयानक जागेची सत्यता?
या बेटावर हजारो बाहुल्या वाईट अवस्थेत झाडावर लटकवलेल्या दिसून येतात. यात काही बाहुल्यांना हात नाही, कुणाला पाय नाही तर कुणाला धड नाही. इथले भयानक दृश्य कोणत्या हाॅरर चित्रपटाहून कमी नाही
बाहुल्यांचे हे बेट हृदयाने कमकुवत असणाऱ्या लोकांसाठी नाही. हे बेट मृत बाहुल्या आणि खोलवर रुजलेल्या दंतकथांनी भरलेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे बेट जी डाॅन सांताना बरेराच्या कहाणीशी जोडलेली आहे
स्थानिकांच्या कथेनुसार, १९५० च्या दशकात, डाॅन ज्युलियन नावाच्या एका माणसाने आपल्या पत्नीला आणि मुलाला सोडले आणि काही कारणास्तव तो या बेटावर गेला. बेटावर जाताच त्याला इथे एका मुलीची डेड बॉडी सापडली, यावेळी तिच्यासोबत एक बाहुलीही होती
ज्युलियनने ही बाहुली आदर आणि शोकाचे प्रतीक म्हणून तिला बेटावरील झाडावर लटकवले. पण लवकरच या बाहुलीच्या दोन बाहुल्या झाल्या आणि लवकरच हे बेट बाहुल्यांनी भरून गेलं. कारण ज्युलियनने अनेक पडलेल्या बाहुल्यांना इथल्या झाडांवर लटकवले होते. त्याने असाही दावा केला की त्याला रात्री पावलांचे आवाज, ओरडणे आणि कुजबुज ऐकू आले
त्याने सांगितले की त्याने मृत मुलीला रडताना ऐकले आणि तिला शांत करण्यासाठी, तो आणखी बाहुल्या लटकवत राहिला. त्याला असा विश्वास होता की त्या तिच्या भूताला दूर करतील. बुडलेल्या मुलीची कोणतीही नोंद नसली तरी, लोकांना असा संशय आहे की डॉन ज्युलियनने काल्पनिक कहाणी रचली असेल किंवा त्याला कोणीतरी पछाडले असेल. यामागील सत्य मात्र नक्की काय आहे ते अद्याप उलगडले नाही
बाहुल्यांच्या बेटावर पोहोचण्यासाठी, पर्यटकांना ट्रॅजिनेरा (पारंपारिक सपाट तळाची बोट) घ्यावी लागते. येथे ते त्यांच्या बाहुल्या देखील सोडू शकतात. संपूर्ण बेटावर खूप शांत वातावरण आहे. ज्युलियनचे कुटुंब अनेकदा त्याला भेटायला तिथे येत असतं, पण त्याच बेटावर एकदा २००१ मध्ये त्याचा मृतदेह आढळला ज्यांनंतर हे बेट एक तीर्थक्षेत्र बनले. आजही अनेक पर्यटकांना जे बेट आपल्याकडे आकर्षित करते