तुमच्या आजूबाजूला लहान मोठ्या अशा अनेक नद्या असतील. जवळपास प्रत्येक लहान-मोठ्या नदीवर बांधलेले पूल तुम्ही पाहिले असतील. पण तुम्हाला माहित आहे का की जगात एक अशी नदी आहे ज्यावर आजपर्यंत कोणीही पूल बांधू शकले नाही. या नदीवर पूल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. या नदीवर अजूनपर्यंत कोणताही पूल का बांधण्यात आला नाही आणि ही नदी नेमकी आहे तरी कोणती याबद्दल अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
जगातील एकमेव नदी जिच्यावर आजपर्यंत एकही पूल बांधला नाही, काय आहे कारण? जाणून घ्या
जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी असलेल्या ॲमेझॉन नदीवर आजपर्यंत कोणताही पूल बांधण्यात आलेला नाही. वास्तविक या नदीच्या काठावरील माती अतिशय मऊ आहे, त्यामुळे येथे पूल बांधल्यास खूप खर्च येईल.
ॲमेझॉन नदीवर पूल न बांधण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे त्याची रुंदी खूप मोठी आहे. या नदीच्या आसपासची लोकसंख्याही कमी आहे. अशा परिस्थितीत पूल बांधण्याची गरज भासली नाही.
ॲमेझॉन नदी पेरूच्या अँडीज पर्वतरांगांमधून उगम पावते आणि अटलांटिक महासागराला मिळते. या नदीला जैवविविधतेचे केंद्र म्हटले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात प्राणी आणि वनस्पती आढळतात.
ॲमेझॉन नदी ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, फ्रेंच गयाना आणि सुरीनाममधून जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲमेझॉन नदीची एकूण लांबी अंदाजे 6400 किलोमीटर आहे.
दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी महत्त्वाची मानली जाते. नदीच्या काठावर सर्वात मोठे वर्षावन आहेत. ही जंगले खूप घनदाट आहेत.
लाखो वर्षांपूर्वी ॲमेझॉन नदी प्रशांत महासागराच्या विरुद्ध दिशेने वाहत होती, पण आज ही नदी अटलांटिक महासागराला मिळते. आज त्यात मोठ्या प्रमाणात तलाव तयार झाले आहेत.
ॲमेझॉन नदीचा प्रवास अतिशय आकर्षक वाटतो कारण या नदीवर पूल नसल्यामुळे फक्त बोटीचाच आधार आहे. या ठिकाणी गुलाबी रंगाच्य डॉल्फिन पर्यटकांना आकर्षित करतात.