पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी एका गायीने वासराला जन्म दिला आहे. त्या वासराच्या कपाळावर प्रकाशाचे प्रतीक असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वासराचे नाव ‘दीपज्योती’ ठेवले आहे, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या एक्स मीडिया प्लॅटफॉर्म फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दिली.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी 'दीपज्योती'चे आगमन, प्रिय माता गायीने दिला वासराला जन्म (फोटो सौजन्य- Narendra Modi x Page)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या X हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी एका गायीने वासराला जन्म दिला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले की त्यांनी या वासराचे नाव 'दीपज्योती' ठेवले आहे.
, 'आपल्या धर्मग्रंथात म्हटले आहे - 'गाव: सर्वसुख प्रदा'. लोककल्याण मार्गावर असलेल्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी कुटुंबात नवीन सदस्याचे शुभ आगमन झाले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रिय माता गायीने नवीन वासराला जन्म दिला असून त्याच्या कपाळावर प्रकाशाचे प्रतीक आहे. मी त्याचे नाव 'दीपज्योती' ठेवले आहे. अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी स्वत: दिली.
आंध्र प्रदेशातील पीएम मोदींच्या निवासस्थानी पुंगनूर जातीच्या गायी राहतात. त्यांची उंची केवळ अडीच ते तीन फूट आहे. पुंगनूर जातीचे वासरू किंवा गाय जन्माला येते तेव्हा त्याची उंची फक्त 16 इंच ते 22 इंच असते. ही गाय अत्यंत पौष्टिक दूध देते.
यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी गायींना चारा खाऊ घातला होता. या गायी त्यांच्या जाती आणि उंचीमुळे चर्चेत असतात. त्यांची छायाचित्रे समोर येताच. सोशल मीडियावरही त्यांची खूप चर्चा झाली.
दूध देखील 8% चरबीसह औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. याचे दूध अनेक प्रकारच्या आजारांवर प्रभावी आहे. ही गाय दररोज 3 ते 5 लिटर दूध देते. मात्र, त्याची किंमत सांगितली तर एक गाय एक ते पाच लाख रुपयांना मिळते.