नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यादिवशी घरात सुगड पूजन केले जाते. याशिवाय महिला हळदीकुंकू सुद्धा करतात. तसेच तीळ, गूळ, नवीन धान्य वाटणे, पतंग उडवणे आणि दान-धर्म करणे यांसारख्या परंपरा अजूनही आहेत. मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. यादिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. हळदीकुंकच्या दिवशी काळ्या रंगाच्या साडीवर आकर्षक हलव्याचे दागिने परिधान केले जातात. त्यामुळे मराठमोळा आणि पारंपरिक लुक करण्यासाठी तुम्ही काठपदरमध्ये काळ्या रंगाची साडी खरेदी करू शकता.यामध्ये तुमचा लुक आकर्षक दिसेल. (फोटो सौजन्य – pinterest)
मकरसंक्रांतीनिमित्त खरेदी करा खास काळ्या रंगाची काठपदर साडी

साध्या बनारसी साडीची मोठी क्रेझ आहे. बनारसी साडीमध्ये अनेक वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत. चांदीच्या जरीचा वापर करून बनवलेली ओरिजनल बनारसी साडी हळदीकुंकू कार्यक्रमासाठी उत्तम पर्याय आहे.

महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळखली जाणारी पैठणी साडी सणावाराच्या दिवशी खुलून दिसते. त्यामुळे तुम्ही काळ्या रंगाची येवला किंवा मुनिया पैठणी खरेदी करू शकता.

काळ्या रंगावर लाल किंवा नारंगी रंगाचे कॉम्बिनेशन उठावदार दिसते. त्यामुळे इतरांपेक्षा हटके आणि स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही या डिझाईनची काठपदर साडी खरेदी करू शकता.

मकरसंक्रांत हा सण थंडीच्या दिवसांमध्ये येतो. त्यामुळे उबदार रंगाचे कपडे परिधान केले जाते. काळा रंग हा शरीरात उबदारपणा टिकून ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे कॉटनची काळ्या रंगाची साडी सुद्धा हळदीकुंकूसाठी उत्तम पर्याय आहे.

मकर संक्रांतीला काळ्या रंगाच्या साडीवर हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने सुंदर लुक करू शकता.






