शीतल देवी आणि राकेश कुमार : भारताची स्टार तिरंदाज जोडी शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी कालच्या मिक्स टीम स्पर्धामध्ये दमदार कामगिरी केली आहे. कालच्या स्पर्धेमध्ये सेमी फायनलमध्ये त्यांना इराण विरुद्ध शूटआऊटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांचा ब्रॉन्झ मेडल सामन्यामध्ये इटलीशी झाला. यामध्ये भारताच्या दोन्ही तिरंदाजानी अद्भुत कामगिरी करत पॅरिस पॅरालिम्पिकमधील आर्चरीचे पहिले मेडल नावावर केले आहे. वैयत्तिक स्पर्धेमध्ये राकेश कुमारचे १ पॉईंटमुळे मेडल हुकले होते, तर क्वार्टर फायनलमध्ये शीतल देवी बाहेर झाली होती. या ऐतिहासिक क्षणाचे काही खास छायाचित्र आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
शीतल देवी आणि राकेश कुमार यांचे ब्रॉन्झ मेडल सामन्याचे काही खास फोटो फोटो सौजन्य - World Archery सोशल मीडिया
शीतल देवी आणि राकेश कुमार या पॅरा तिरंदाज जोडीने क्वालिफिकेशन राउंडमध्ये चमकदार कामगिरी करत विश्वविक्रम नावावर केला आहे. मिक्स टीममध्ये भारताची ही पॅरा जोडी पहिल्या स्थानावर होती. फोटो सौजन्य - World Archery सोशल मीडिया
शीतल देवीने क्वालिफिकेशन राउंडमध्ये दमदार कामगिरी केली होती, परंतु तिला क्वार्टर फायनल सामन्यामध्ये १ पॉईंटमुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. फोटो सौजन्य - World Archery सोशल मीडिया
राकेश कुमार यांनी वैयक्तिक स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली, परंतु ब्रॉन्झ मेडल सामन्यामध्ये त्यांना एक पॉईंटमुळे मेडल गमवावे लागले होते. फोटो सौजन्य - World Archery सोशल मीडिया
ब्रॉन्झ मेडल सामन्यामध्ये शीतल देवी आणि राकेश कुमार या भारताच्या जोडीने इटलीचा १५६-१५५ असा पराभव करून कांस्यपदक नावावर केलं आहे. फोटो सौजन्य - World Archery सोशल मीडिया
कांस्यपदक मिळवल्यानंतर शीतल देवी आणि राकेश कुमार हे दोघेही भावुक होताना दिसले, आर्चरीमध्ये पॅरिस पॅरालिम्पिकचे हे पहिले मेडल आहे. फोटो सौजन्य - World Archery सोशल मीडिया