साडी किंवा ड्रेस घातल्यानंतर लुक आणखीनच सुंदर दिसण्यासाठी मुली केस मोकळे सोडतात. पण काही वेळानंतर मोकळ्या केसांमध्ये खूप जास्त गुंता होऊन केस अतिशय विचित्र दिसू लागतात. त्यामुळे केसांची शोभा वाढवण्यासाठी वेणी हेअर स्टाईल करावी. काहींना वेणी हेअरस्टाईल अतिशय ओल्ड फॅशन वाटते. पण वेणी घातल्यामुळे केस व्यवस्थित बसतात आणि केसांमध्ये गुंता होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वेणी हेअरस्टाइलचे विविध प्रकारांबद्दल सांगणार आहोत. या वेणी हेअर स्टाईल कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर दिसतात. (फोटो सौजन्य – pinterest)
मोकळे केस सोडल्यानंतर केसांचा कायमचा गुंता होतो? मग 'या' वेणी हेअरस्टाईल दिसतील अधिक सुंदर

साडी नेसल्यानंतर किंवा कोणताही ट्रेडीशनल साडी नेसल्यानंतर तुम्ही या पद्धतीने सुंदर आणि आकर्षक वेणी हेअर स्टाईल करू शकता. वेणी घातल्यानंतर गजरा आणि कोणतीही रंगीत फुले लावल्यास केस अतिशय सुंदर दिसतील.

काहींना अतिशय साधी वेणी हेअर स्टाईल करायला खूप जास्त आवडत. या पद्धतीची वेणी केस तीन भागात विभागून बांधली जाते. यामुळे केस गुंत नाहीत.

सणावाराच्या दिवसांमध्ये साडी नेसल्यानंतर याब पद्धतीची खजूर वेणी घातल्यास केस अतिशय सुंदर दिसतील. खजूर वेणी लुकची शोभा वाढवते.

इंडोवेस्टर्न कपडे घातल्यानंतर क्रॉस वेणी घातली जाते. ही वेणी ड्रेसवर सुद्धा शोभून दिसेल. साध्या कपड्यांवरील लुक स्टायलिश करण्यासाठी तुम्ही क्रॉस वेणी घालू शकता.

शॉर्ट हेअर असलेल्या मुली प्रामुख्याने या पद्धतीची हेअर स्टाईल करणे जास्त पसंत करतात. कारण यामुळे स्टायलिश आणि मॉर्डन लुक दिसतो.






