ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स नव्हे तर मिचेल मार्श करेल. दुखापतीमुळे पॅट कमिन्स एकदिवसीय मालिकेतून बाहेर आहे. दरम्यान, या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियातील तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे पाच सामना जिंकणारे खेळाडू एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडले आहेत.
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंगलिसही दुखापतीमुळे पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघाबाहेर असेल. तिसऱ्या सामन्यात तो संघात परतू शकतो. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकी गोलंदाज अॅडम झांपा देखील सध्या दुखापतीने त्रस्त आहे. यामुळे तो पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो ऑस्ट्रेलियन संघात परतू शकतो. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
दुखापतीमुळे विकेटकीपर फलंदाज अॅलेक्स कॅरीलाही एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मुकावा लागू शकतो, अशा परिस्थितीत कॅरी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पुनरागमन करू शकतो. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
क्रिकेट ऑस्ट्रेलिया ग्रीनसोबत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही, कारण संघ इंग्लंडविरुद्ध अॅशेस खेळणार आहे. पॅट कमिन्सची संघातून अनुपस्थिती ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का आहे. पाठीच्या दुखापतीमुळे कमिन्स टीम इंडियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचाही भाग नाही. त्याच्या जागी मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
एकदिवसीय मालिका सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीन दुखापतीमुळे संपूर्ण एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मार्नस लाबुशेनचा एकदिवसीय मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया