हिवाळ्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर अननस उपलब्ध असतात. आंबटगोड चवीचे अननस सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. अननसपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि एन्झाईम्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण काहींच्या आरोग्यासाठी अननस अतिशय धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी अननस अजिबात खाऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
'या' लोकांच्या आरोग्यासाठी अननस ठरेल विषासमान

अननसामध्ये ब्रोमेलेन आणि आम्ल असे दोन्ही घटक आढळून येतात. यामुळे पचनक्रिया सुधारते. पण आम्लपित्त, छातीत जळजळ किंवा वारंवार पोटदुखी इत्यादी समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी अननस अजिबात खाऊ नये. यामुळे पोटाच्या आतील स्थर अधिक सक्रिय होऊन छातीमध्ये जळजळ, पोटदुखी, मळमळ किंवा गॅसची समस्या वाढू शकते.

वारंवार अल्सर किंवा तोंडात फोड येत असतील अननसाचे सेवन अजिबात करू नये. यामध्ये असलेल्या आम्लपित्त आणि ब्रोमेलेनमुळे अल्सरचा वेदना आणखीनच वाढू शकतात. यामुळे जळजळ किंवा तोंडाच्या आतील भागात मोठे मोठे फोड येतात.

अननसामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. मधुमेह असलेल्या लोकांनी अननस अजिबात खाऊ नये. यामुळे रक्तात झपाट्याने साखर वाढते आणि मधुमेह आणखीनच सक्रिय होतो.

अननस खाल्ल्यानंतर ओठांवर किंवा जिभेवर खाज सुटणे, घशात सूज येणे, त्वचेवर पुरळ येणे आणि पोटात वेदना होत असतील तर अननस खाऊ नये. चुकून अननस खाल्ल्यास या समस्या आणखीनच वाढू लागतात.

रक्त पातळ करणारी औषधे, अँटीबायोटिक्स आणि दाहक-विरोधी औषधांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींनी अननसचे अजिबात सेवन करू नये. औषधांसोबत अननस खाल्ल्यास शरीरात बिघाड होण्याची शक्यता असते.






