प्रेमानंद महाराजांचे प्रवचन सोशल मिडियावर नेहमीच फार चर्चेत असतात. त्यांची ख्याती देशभर इतकी पसरली आहे की, मोठमोठे सेलिब्रिटीही त्यांना पाहण्यासाठी वृंदावनाला भेट देतात. आपल्या प्रवचनांद्वारे आणि सत्संगाद्वारे प्रेमानंद महाराज लोकांना भक्तीचा मार्ग दाखवतात. त्यांचे अनेक व्हिडिओज नेहमीच सोशल मिडियावर व्हायरल होत असतात आणि असाच एक व्हिडिओ नुकताच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात प्रेमानंद महाराजांनी वाढदिवस हा शोक साजरा करण्याचा दिवस असल्याचे स्पष्ट केले. आता ते असं का म्हणाले आणि योग्यरीत्या आपला वाढदिवस कसा साजरा करावा ते चला जाणून घेऊया.
प्रेमानंद महाराज वाढदिवसाला का म्हणाले शोक साजरा करण्याचा दिवस? कशाप्रकारे साजरा करायला हवा Birthday?
अनेकजण आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी प्रेमानंद महाराजांची भेट घेतात आणि त्यांना प्रश्न विचारतात. महाराज भक्तांच्या समस्या दूर करत त्यांना योग्य ते उत्तर देतात
अशातच एका भेटीत भक्ताने प्रमानंद महारजांना वाढदिवसाचे आध्यात्मिक महत्त्व काय आणि वाढदिवस कसा साजरा करावा असा प्रश्न केला
याच्या उत्तरात महाराजांनी हा दिवस शोकाचा दिवस मानला जात असल्याचे स्पष्ट केले. याचे कारण म्हणजे हा दिवस आठवण करुन देतो की आपल्या जन्माचे आणखीन वर्षे निघून गेले आहेत
व्यक्ताच्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रमानंद महाराज म्हणाले की, वाढदिवसाच्या दिवशी संतांची किंवा गायींची सेवा करावी. शक्य असल्यास या दिवशी भजन करावे
महाराजांनी सांगितले की, आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आयुष्यातील आणखी एक वर्ष कमी होतो. त्यामुळे संकल्प करा की, येत्या काळात आपल्या हातून कुणाचेही अमंगल घडू नये. या दिवशी सात्विक जेवण बनवा आणि दुसऱ्यांनाही खायला घाला