अली अब्बास जाफर दिग्दर्शित 'गुंडे' चित्रपट १४ फेब्रुवारी २०१४ मध्ये बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. चित्रपट रिलीज होऊन आज १० वर्षे झाले आहेत. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत रणवीर सिंग, अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा आणि इरफान खान होते. अनेक वर्षांनंतर अभिनेत्री प्रियंका चोप्राने शुटिंगदरम्यानचे कधीही न पाहिलेले फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
Priyanka Chopra Shares Unseen BTS Photos
अली अब्बास जाफर दिग्दर्शित 'गुंडे' चित्रपट रिलीज होऊन १० वर्षे झाले आहेत. १४ फेब्रुवारी २०१४ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत रणवीर सिंग, अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा आणि इरफान खान आहे. चित्रपटाचे अनसीन बीटीएस फोटोज प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपट रिलीज होऊन १० वर्षे झाल्यानंतर सहज फोटो शेअर केले आहेत. ह्या ॲक्शन थ्रिलर चित्रपटातल्या गाण्यांचे चाहते आजही फॅन्स आहेत. शेअर केलेल्या फोटोत अभिनेत्रीने शुटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत.
५१ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या ह्या चित्रपटाने १३० कोटींची जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाचे कथानक पश्चिम बंगालमधील १९७१ ते १९८८ मधील दोन गुंडांचे आणि मित्रांचे आहे.
फोटो शेअर करताना प्रियंकाने कॅप्शन दिले की, "मी माझ्या मोबाईलमध्ये काही फोटो पाहत होते. ते पाहत असताना माझ्या हाती काही जुन्या आठवणी लागल्या. हे कुणाला आठवतंय का ? आतापर्यंतच्या सर्वात मजेशीर कामांपैकी एक आहे. अविश्वसनीय ठिकाण, सर्वात मजेदार कलाकार, क्रू आणि सुंदर दिग्दर्शक अली अब्बास झाफरने आम्हाला एकत्र आणले. २०१३ मध्ये चांगल्या माणसांनी चांगल्या आठवणी बनल्या आहेत."
अभिनेत्रीने या फोटोंमध्ये शुटिंग दरम्यानचे मज्जा मस्ती दरम्यानचे अनेक फोटो शेअर केलेले आहेत. जुन्या आठवणींमध्ये सध्या प्रियंका चांगलीच रमली असून चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.