विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पुण्यातील उमेदवारांसह इतर नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. नेत्यांचे भविष्य आता ईव्हीएम मशीनमध्ये लॉक झाले आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी जनतेने कौल कोणाच्या बाजूने दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Political Leaders and Candidates Vote in Pune Maharashtra Assembly Election 2024 Live News

कसबा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार गणेश भोकरे व पत्नीसह मतदानाचा अधिकार बजावला.

माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

पुणे कँटोन्मेंट मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी सपत्नीक भवानी पेठेत मतदान केले.

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवाजीनगर पुणे येथे मतदानाचा हक्क बजावला.

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी शिवाजी नगर, पुणे येथे आज मतदानाचा हक्क बजावला.

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी व विश्राम कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी कुटुंबासह मतदान केले.

कोराडी येथे मतदान केंद्रावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदानाचा अधिकार बजावला.

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.






