देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन आता 77 वर्षे पूर्ण झाली आहेत मात्र आजही महाराष्ट्रात असलेल्या रेल्वे ट्रॅकवर ब्रिटिश कंपनीचे नियंत्रण आहे. यामुळे भारतीय रेल्वेला ब्रिटनच्या कंपनीला कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी द्यावी लागते. हा रेल्वे ट्रॅक खरेदी करण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेकदा प्रयत्न केले, मात्र यात त्यांना यश आले नाही. हे नक्की कोणते रेल्वे ट्रॅक आहे? जाणून घ्या.
महाराष्ट्रातील हा रेल्वे ट्रॅक अजूनही इंग्रजांकडेच, ब्रिटिश कंपनीला द्यावे लागतात कोट्यवधी रुपये

इंग्रज गेले, पण भारतात असा एक रेल्वे ट्रॅक आहे ज्यावर त्यांचा आजही हक्क आहे. Click Nixon End नावाची एक ब्रिटिश कंपनीच्या मालिकेची सेंट्रल प्रोविजन्स रेल्वे कंपनी आहे. त्या कंपनीकडे महाराष्ट्रातील अमरावतीपासून मुर्तजापूरच्या 190 किमी अंतराचा ट्रॅक आहे.

हा रेल्वे ट्रॅक विकत घेण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेकवेळा प्रयत्न केले, मात्र यातून काहीही निष्पन्न होऊ शकले नाही. रिपोर्टनुसार, भारतीय रेल्वे या ट्रॅकच्या वापरासाठी दरवर्षी ब्रिटीश कंपनीला 1 कोटी 20 लाख रुपयांची रॉयल्टी देते

या रेल्वे ट्रॅकवर शकुंतला एक्स्प्रेस नावाची एकच पॅसेंजर ट्रेन धावते, त्यामुळे या ट्रॅकला शकुंतला रेल्वे ट्रॅक म्हणतात. 70 वर्षे ही ट्रेन वाफेच्या इंजिनने धावली, जी ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये 1921 मध्ये तयार करण्यात आली होती. त्यात 1994 साली डिझेल इंजिन बसवण्यात आले. या रेल्वे ट्रॅकमध्ये बसवलेले सिग्नल आजही ब्रिटीशकालीन आहेत.

या रेल्वे मार्गावर फक्त एकच शकुंतला पॅसेंजर ट्रेन धावत होती, जी आता बंद करण्यात आली आहे. या भागातील लोक ही ट्रेन पुन्हा सुरु करण्याची मागणी करत आहेत. 1951 मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले, नंतर हा ट्रॅक भारत सरकारच्या आधीन नाही केला गेला.

हा रेल्वेमार्ग बांधण्यासाठी ब्रिटनच्या क्लिक निक्सन अँड कंपनीने सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी (CPRC) स्थापन केली. सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय रेल्वेने या कंपनीसोबत करार केला. त्यामुळे हा ट्रॅक वापरण्यासाठी त्यांना दरवर्षी कंपनीला रॉयल्टी द्यावी लागत होती.






