दरवर्षीप्रमाणे यंदाही सिनेविश्वातील लाडक्या बहिणींचे रक्षाबंधन संपन्न झाले असून अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अभिनेत्री अश्विनी बागल यांनी राखी बांधत दिलं रक्षणाचं वचन दिले. रक्षाबंधन हा सण भावा आणि बहिणी मधील प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे. या सणाला बहिण आपल्या भाऊरायाच्या हातावर राखी बांधत रक्षणासाठी वचन घेते तर भाऊराया ही बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे कायम उभं असल्याचं सांगतो. पण, बरेचदा काय होतं ज्या कुटुंबात भाऊ नाही अशावेळी त्या बहिणीचं एकमेकींना राखी बांधत हा दिवस साजरा करतात. या बहिणी एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात. अशी सिनेसृष्टीतील लोकप्रिय बहिणींच्या जोडींपैकी एक म्हणजेच मोनालीसा बागल आणि अश्विनी बागल
रक्षाबंधन हा केवळ भावाबहिणींचा सण नाही तर एकमेकांची रक्षा करणाऱ्या प्रत्येक नात्याचा सण आहे
सिनेसृष्टीत वावरत असताना व खऱ्या आयुष्यातही या दोघी बहिणी एकमेकींच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभ्या असतात. अश्विनी आणि मोनालिसा यांनीही त्यांचे यंदाचं हे रक्षाबंधन अगदी थाटामाटात साजरे केले
पारंपरिक लुकमध्ये दोघींनी हा सण अगदी थाटामाटात साजरा केला. राखी बांधत त्यांनी एकमेकींना रक्षणाच वचन दिलं
नेहमीच एकमेकींना सल्ले, मार्ग दर्शवत त्यांनी करिअर मधील वाटचाल सुरू ठेवली असल्याचं पाहायला मिळालं आहे
अशातच आता दोघींनी दरवर्षीप्रमाणे यंदा रक्षाबंधन साजर करत या खास क्षणाचे काही फोटो शेअर केले आहेत
त्यांच्या चाहत्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. दोन्ही बहिणींनी आपल्या सोशल मीडियावरही फोटो शेअर केले आहेत