हिंदू धर्मात राम या देवतेला मोठं महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्यानगरी ही रामजन्मभूमी म्हणून ओळखली जाते. भारतात अशी अनेक जागा आहेत ज्यांना धार्मिकदृष्ट्या मोठं महत्त्व प्राप्त आहे. रामायणातील अशीच एक जागा म्हणजे किष्किन्धानगरी. या किष्किन्धानगरीचा दक्षिण भारताशी अत्यंत जवळचा संबंध आहे.
रामायणातील संदर्भानुसार सीताहरण झाल्यानंतर प्रभू राम, लक्ष्मण आणि वानरसेना हे उत्तरेकडून दक्षिणेकडे कूच करण्यास निघाले. त्यावेळी या किष्किन्धानगरीचा संबंध आला होता.
अशी आख्यायिका सांगितली जाते की, प्रभू राम रावणासोबतचं युद्ध जिंकले कारण वानरसेनेने मोलाची कामगिरी बजावली होती. रामाचा विजय झाल्यानंतर सीतेसोबत राम आणि वानरसेना अयोध्येकडे निघाले.
रावणाचा पराभव केल्यानंतर हनुमानाचा मोठा भाऊ सुग्रीव हा किष्किन्धा नगरीचा राजा म्हणून त्याने सत्ता हातात घेतली. रावणाचा पराभव केल्यानंतर किष्किन्धानगरीवर वानरसेनेचं राज्य प्रस्थापित झालं असं म्हटलं जातं.
रामायणातील ही किष्किन्धानगरी म्हणजे आजच्या कर्नाटकातील हंपी आहे.
ही किष्किन्धानगरी तुगंभद्रा नदीच्या किनारी वसलेली होती.
निसर्गाचं वरदान लाभलेल्या हंपीला धार्मिक आणि पुरातन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे.
विजयनगर साम्राज्यात हंपी शहर हे शेती,व्यापार आणि देवीदेवळांच्या मंदिरांनी समृद्ध होते, इतिहासात सांगितलं जातं.