बॉलिवूड स्टार्स सतत त्यांचे दिवाळीचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असतात. आता या यादीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचेही एक नाव जोडले गेले आहे. काही काळापूर्वी आलिया भट्टने तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केले होते. या फोटोंमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर कुटुंबासोबत दिवाळीची पूजा करताना दिसत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे फोटो पाहून चाहत्यांच्या नजरा इथेच खेळून राहिल्या आहेत.
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दिवाळीच्या लक्ष्मी पूजेत राहा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत आरती करताना दिसली. दिवाळीनिमित्त आलिया, रणबीर आणि राहा यांनी मॅचिंग कपडे परिधान केले होते. ज्यामध्ये तिघेही खूप सुंदर दिसत होते.
दिवाळीच्या पूजेदरम्यान राहा तिचे वडील रणबीर कपूरच्या मांडीवर बसलेली दिसली. फोटोमध्ये राहा अतिशय गोंडस चेहरा करताना दिसत आहे. राहाच्या या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
नीतू कपूरच्या घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आलिया भट्टच्या लूकचे चाहते सतत कौतुक करत आहेत. आलियाने हे सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रणबीर कपूरच्या कुटुंबाने ३१ ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली. यावेळी रणबीर कपूर त्याच्या संपूर्ण कुटुंबासह नीतू कपूरच्या घरी पोहोचला होता. संपूर्ण एकत्र कुटुंब दिवाळी साजरी करताना दिसले आहेत.
आलिया भट्टने दिवाळीनिमित्त तिच्या सासरच्या घरी खूप पोज देऊन फोटो काढताना दिसली. या फोटोमध्ये आलियाने गोल्डन रंगाची साडी परिधान केली आहे. तिचा लूक उजळण्यासाठी आलियाने केसांमध्ये सुंदर फुलं देखील सजवली आहेत.
दिवाळीच्या दिवशी आलिया भट्टनेही तिच्या सासरच्या घरी सुंदर रांगोळी काढली आहे. आलिया भट्टने तिच्या रांगोळीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.