दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. अपचन झाल्यानंतर बऱ्याचदा सोडा किंवा इतर वेगवेगळे ड्रिंक प्यायले जातात. पण वारंवार सोडा किंवा प्रक्रिया केलेल्या पेयांचे सेवन केल्यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता असते. चवीला सुंदर लागणाऱ्या पेयांमुळे मूत्रपिंडाच्या आरोग्याला हानी पोहचते. याशिवाय किडनीमध्ये स्टोन होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या पेयांचे सेवन केल्यामुळे किडनीचे आरोग्य बिघडते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांचे अजिबात सेवन करू नये. (फोटो सौजन्य – istock)
'या' चवदार पेयांचे नियमित सेवन केल्यास किडनी होईल कायमची निकामी

थंड पेय किंवा सोड्यामध्ये फॉस्फोरिक आम्ल, साखर आणि कॅफिन इतर अनेक घटक आढळून येतात. यामुळे किडनीचे आरोग्य बिघडून जाते. तसेच सतत सोडा प्यायल्यामुळे आतड्यांचे आरोग्य बिघडते.

डाएट सोड्यामध्ये एस्पार्टम सारखे कृत्रिम गोड पदार्थ असतात, ज्याचे वारंवार सेवन केल्यामुळे किडनी निकामी होऊन रक्त शुद्ध होण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.

शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी एनर्जी ड्रिंक प्यायले जाते. पण यामध्ये कॅफिन आणि उत्तेजक घटकांचे प्रमाण जास्त असते. या पेयांचे सतत सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाब वाढतो.

सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक फळांच्या रसाचे सेवन करतात. पण प्रक्रिया केलेल्या किंवा पॅक बंद फळांच्या रसामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्याचा आरोग्यावर परिणाम होतो.

काहींना सतत कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असते. पण सतत चहाकॉफीच्या सेवनामुळे शरीरात कॅफिनची पातळी वाढते आणि आरोग्य बिघडून जाते.






