मानवी शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करतात, तर खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. शरीरात जमा झालेल्या चिकट थरामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे. (फोटो सौजन्य – iStock)
शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे नियमित सेवन
एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि फायबर इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी तुम्ही एवोकॅडोचे सेवन करू शकता.
रोजच्या आहारात फायबरयुक्त अन्नपदार्थांचे सेवन करावे. भाकरी, चपाती, ओट्स, लापशी इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये चांगले फॅट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
आहारात चरबीयुक्त माशांचे सेवन केल्यामुळे शरीराला फायदे होतात. त्यामुळे आहारात तुम्ही ग्रील्ड किंवा बेक्ड मासे खाऊ शकता. याशिवाय सॅल्मन, मॅकरेल, सार्डिन मासे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत.
शरीरात निरोगी चरबीचे प्रमाण वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर नट्स खावे. यामध्ये तुम्ही काजू, बदाम, मनुके, अक्रोड इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता.
रोजच्या आहारात इतर कोणत्याही हानिकारक तेलाचा समावेश करण्यापेक्षा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचा वापर करावा. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि फायद्याचे आहे.