नवी दिल्ली: आज स्वतंत्र भारत संविधानाच्या अंमलबजावणीला ७५ वर्षे पूर्ण होत असून भारत आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी कर्तव्यपथावर देशाचे नेतृत्व करत आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास लुक केला असून रंगीबेरंगी पगड्या आणि पारंपरिक लुक्सची परंपरा सुरुच ठेवली आहे. आज आपण गेल्या काही वर्षातील नरेंद्र मोदींच्या खास लुकवर नजर टाकणार आहोत.
Narendra Modi's Look Of Republic Day
यंदा 2025 च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींनी केशरी आणि लाल रंगाची पगडी (साफा) परिधान केली आहे. ही तपकिरी रंगाच्या बंधगळा कोट आणि क्रीम रंगाच्या चुरिदार कुर्ता सेटसोबत जुळत आहे.
गेल्या वर्षी 2024 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नरेंद्र मोदींची पगडी खूप चर्चेत होती. त्यांनी केशरी, गुलाबी, पांढरा आणि पिवळ्या रंगातील बांधनी प्रिंटची पगडी परिधान केली होती. त्यांनी ती पगडी पांढऱ्या कॉटन कुर्ता-पायजमा आणि तपकिरी सदरीसोबत परिधान केली होती.
2023 च्या 74 व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी नारंगी, लाल, हिरवा, पिवळा आणि पांढऱ्या रंगांच्या पारंपरिक फेट्याची निवड केली होती. त्यांनी क्रीम रंगाचा चुरिदार कुर्ता, काळ्या रंगाचा बंधगळा कोट आणि रेशमी शाल परिधान करून आपला पोशाख पूर्ण केला.
2022 साली 73 व्या प्रजासत्ताक दिनच्या वेळी नरेंद्र मोदीं यांनी पारंपरिक कुर्ता, पायजमा आणि ग्रे चेक जॅकेट परिधान केले होते. यावेळी त्यांनी उत्तराखंडच्या पारंपरिक टोपीसह ब्रह्म कमळ प्रेरित ब्रोच आणि स्कार्फ घालून आपला लूक आकर्षक बनवला होता.
2021 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जामनगरच्या राजघराण्याकडून भेट म्हणून मिळालेली ‘हलारी पगडी’ परिधान केली होती. ही पगडी लाल रंगाच्या बांधणी कापडावर पिवळ्या ठिपक्यांची होती. त्यांनी ती ग्रे जॅकेट, पांढऱ्या कुर्ता-पायजमा आणि भरतकाम असलेल्या शालीसह परिधान केली होती.
2020 साली 71 व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेपट्यासह केशरी रंगाची बांधेज पगडी परिधान केली होती. या पगडीची खास डिझाइन बांधणी कापडातील असून ही राजस्थान आणि गुजरातमध्ये प्रचलित आहे.
2019 च्या प्रजासत्ताक दिना दिवशी नरेंद्र मोदी यांनी लाल पिवळसर-केशरी रंगाची पगडी परिधान केली होती. त्यांनी ती तपकिरी जॅकेट, क्रीम रंगाचा कुर्ता आणि चुरिदार पायजम्यासह परिधान केली होती.