बाजारात पिवळ्या रंगाची केळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. केळी खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. मात्र आज आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या लाल केळ्यांबद्दल सविस्तर माहिती आणि फायदे सांगणार आहोत. लाल केळी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. ही केळी प्रामुख्याने दक्षिण भारत, आग्नेय आशिया आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर पिकवली जातात. या केळ्यांचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. हृदय आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात लाल केळ्यांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया लाल केळी खाल्यामुळे आरोग्याला होणारे गुणकारी फायदे.(फोटो सौजन्य – iStock)
अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध असलेली लाल केळी आरोग्यासाठी ठरतील वरदान
लाल केळीमध्ये विटामिन सी आणि बी६ भरपूर प्रमाणात आढळून येतात. या केळ्यांचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. हंगामी संसर्ग टाळण्यासाठी लाल केळी खावीत.
लाल रंगाच्या केळ्यामध्ये असलेली नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा देतात. याशिवाय थकवा, अशक्तपणा यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत होते.
लाल रंगाच्या केळ्यांमध्ये फायबर भरपूर असते. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. पचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित एकतरी लाल रंगाचे केळं खावे.
केळ्यांमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लाल रंगाची केळी खावीत.
लाल केळी खाल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. याशिवाय लाल केळ्यामध्ये असलेले लोह शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते.