भारतीय क्रिकेट संघामधील फलंदाज रिंकु सिंह आणि प्रिया सरोज यांचा काल साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला काल अनेक राजकीय व्यक्तिमत्व त्याचबरोबर भारतीय क्रिकेट खेळाडू देखील उपस्थित होते. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत यावर एकदा नजर टाका.
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो. फोटो सौजन्य : Priya Saroj
रिंकु सिंह आणि प्रिया सरोज याचा साखरपुडा हा 8 जून रोजी पार पडला. या कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेट आणि राजकीय सेलिब्रिटींनी हजेरी लावली. प्रिया सरोज हिने सोशल मिडीयावर फोटो शेअर केले आहेत. फोटो सौजन्य : Priya Saroj
यामध्ये तिने कॅप्शन लिहीले आहे की, हा दिवस आमच्या हृदयात खूप दिवसांपासून आहे - जवळजवळ तीन वर्षे - आणि वाट पाहण्याचे प्रत्येक सेकंद सार्थकी लागले..गुंतलेलो - पूर्ण मनाने आणि कायमचे राहण्यासाठी. फोटो सौजन्य : Priya Saroj
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव त्यांच्या पत्नी डिंपल यादवसह या कार्यक्रमाला उपस्थित होते. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील उपस्थित होते. लखनऊमधील द सेंट्रम फाइव्ह स्टार हॉटेल हे महागड्या हॉटेल्सपैकी एक आहे. फोटो सौजन्य : Priya Saroj
समोर आलेल्या छायाचित्रात, रिंकू सिंगने सुंदर शेरवानी घातली आहे, तर प्रियाने सुंदर भरतकाम केलेला गुलाबी लेहेंगा घातला आहे. रिंकू आणि प्रिया एकमेकांचे हात धरून स्टेजवर जाताना दिसले. फोटो सौजन्य : Priya Saroj
रिंकु सिंह आणि प्रिया सरोज हे जेव्हा दोघे एकमेकांना अंगठी घालत होते. त्यानंतर प्रिया सरोज ही भावुक होताना दिसली, या दोघांचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. फोटो सौजन्य : Priya Saroj