बॉलीवूड अभिनेता रोहित सराफ यांच्या नुकत्याच ‘इश्क विश्क प्यार व्यार’ या यशस्वी चित्रपटानंतर त्याची सोशल मीडियावरील हवा वाढली आहे. त्याच्या अभिनयाने चाहत्यांना वेडे केले आहेत. तसेच सध्या तो सतत सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे चर्चेत आहे. अभिनेता रोहित सराफ नेहमीच त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असतो. तसेच त्याने नुकतेच त्याचे स्टायलिस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
अभिनेता रोहित सराफचा पाहुयात स्टायलिस्ट लुक जो सध्या चर्चेत आहे. (फोटो सौजन्य -Instagram)
रोहित सराफचे सोशल मीडियावरील फोटो पाहून त्या फोटोला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. रोहितने पोस्ट केलेल्या या पोस्टमध्ये त्याने काळ्या रंगाचे टीशर्ट घातले असून, त्यावर त्याने रेशीम धाग्याने विणलेला निळ्या आणि राखाडी रंगाचा शर्ट परिधान केला आहे.
या लुक मध्ये रोहित खूप क्युट आणि आकर्षित दिसत आहे. त्याने घातलेले शर्ट त्याच्यावर अत्यंत उठून दिसत आहे. हा लुक पाहून चाहत्यांनी पोस्टवर कंमेंटची बरसात केली आहे.
रोहितने या टीशर्ट आणि शर्ट सह गळ्याभवती नाजूक चैन घातली आहे जे पाहून त्याच्याकडील लक्ष हटतच नाही आहे. कोणत्याही मुलाच्या गळ्यात छोटा दागिना हा रेखील आणि अप्रतिम दिसत असतो.
रोहित सराफची या फोटोमधील क्युटशी स्माईल पाहून कोणीही घायाळ होऊ शकते. त्याचा हा लुक कोणत्याही पार्टीसाठी किंवा कार्यक्रमासाठी परफेक्ट आहे. अभियान बरोबरच रोहित सराफ आता फॅशन दुनियेतदेखील प्रसिद्ध होताना दिसत आहेत.