"सजा-ए-काला पानी" याविषयी तुम्ही अनेकदा ऐकले असेल. ही ती जेल आहे, जी ब्रिटीश काळात स्वातंत्र्यसैनिकांना शिक्षा देण्यासाठी बनवण्यात आली होती. आजही या जेलला देशातील सर्वात भयानक जेल म्हणून ओळखले जाते. या जेलमध्ये जिवंतपणीच मृत्यूच्या सहय्य यातना दिल्या जातात, ज्यामुळे जिवंतपणीच व्यक्तीची जगण्याची इच्छा मरुन जावी. आजही या जेलचा उल्लेख आला की, लोक थरथर कापू लागतात.
Saja-e-Kaala Pani: भारतातील सर्वात भयानक जेल जिथे कैद्यांना जिवंतपणीच दिल्या जायच्या मृत्यूच्या यातना
सजा-ए-काला पानी किंवा सेल्यूलर जेल म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांना दिली जाणारी जन्मठेपेची शिक्षा. ही शिक्षा अंदमान आणि निकोबार बेटांवर दिली जात असे
भारतीय क्रांतिकारकांना शिक्षा देण्यासाठी आणि त्यांना मुख्य भूभागापासून दूर ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी या शिक्षेचा उपयोग केला. भारतीय स्वातंत्र्यासैनिकांवर अत्याचार करण्यासाठी ब्रिटिशांनी हे जेल बांधले होते
या जेलमधील कैद्यांना शारीरीकदृष्ट्याच नाही तर मानसिकदृष्ट्याही हतबल केले जायचे. येथे कैद्यांना बोलण्याची किंवा रडण्याची परवानगी नव्हती
या जेलमध्ये एकून ५९३ कोठडी होत्या. प्रत्येक कोठडीत फक्त एका कैद्याला ठेवले जायचे. यावेळी कैद्याशी बोलायला किंवा त्याचे ऐकूण घ्यायला तेथे कोणीच नसायचे
समुद्राने वेढलेल्या या जेलमधून पळून जाणं अशक्य होतं. आजही हे ठिकाण एक ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखले जाते