अभिनेता टायगर श्रॉफ मोठ्या पडद्यावर नेहमीच गाजत असतो. बी टाऊनचा टायगर हिरोपंती करत आज आपल्या अभिनयाच्या जोरावर देशातील घराघरामध्ये पोहचला आहे. जगभरातील अनेक तरुणी टायगरसाठी वेड्या आहेत. दरम्यान, टायगर सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह असतो, तसेच आपल्या चाहत्यांशी जोडलेला असतो. अशात त्याने एक नवीन पोस्ट केली आहे.
हंक काय असतं... याची उत्तम व्याख्या; टायगरच्या बॉडीची तरुणींना गोडी (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेता टायगर श्रॉफने त्याच्या @tigerjackieshroff या इंस्टाग्राम हॅन्डलवर नवा फोटोशूट शेअर केला आहे. त्याचा हा लुक अतिशय राऊडी वाटत आहे.
मिड आकारचे wavy केस, रुबाबदार दाढी आणि डोळ्यावर काळा चष्मा असा हटके लुक मारला आहे. टायगरचा हा राऊडी अंदाज सोशल मीडियावर फार पसंत केला जात आहे.
सफेद शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट असा हा राऊडी लुक तरुणींना भुरळ घालत आहे. तसेच फोटोशूट केले गेलेले ठिकाणाला लोक पसंती देत आहेत.
नेटकऱ्यांनी टायगरच्या या लुकला पसंती दाखवली आहे. नेटकरी कॉमेंट्समध्ये प्रतिसादांचा वर्षाव करत आहेत.
टायगरच्या या लूकला पाहून चाहत्यांनी अनेक कॉमेंट्स केले आहेत. तसेच टायगरने पोस्टखाली कॅप्शनमध्ये या लुकसंबंधित माहिती दिली आहे.