जेव्हा स्वतः भगवंतालाच राक्षसी माया कळत नाही! ही कथा दाखवते की दैवी शक्ती असली तरी ‘माया’च्या प्रभावापासून कोणीही पूर्णपणे सुटत नाही. एकदा द्वारकेवर शाल्व नावाच्या भयंकर राक्षसाने हल्ला केला. हा शाल्व सामान्य नव्हता; त्याच्याकडे एक अद्भुत विमान होते, ज्यामुळे तो हवेतून उडत श्रीकृष्णावर हल्ले करत होता.
शाल्वाची श्री कृष्णावर केलेली माया. (फोटो सौजन्य - Social Media)

त्या काळात विमान असणे म्हणजे एक आश्चर्यच! त्याने युद्धाची अशी रणनिती आखली की श्रीकृष्णालाही काही क्षणासाठी संभ्रम झाला.

श्रीकृष्णाने यापूर्वी कंस, पूतनासारख्या अनेक असुरांचा नाश केला होता. पण शाल्वाच्या मायेमुळे परिस्थिती वेगळी झाली.

युद्ध सुरू असताना शाल्वाने आपल्या मायावी शक्तीने श्रीकृष्णाच्या वडिलांची वसुदेवांची आकृती निर्माण केली आणि ती आपल्या विमानातून खाली फेकली.

हे दृश्य पाहून श्रीकृष्णाला वाटले की त्याचे वडील प्रत्यक्षातच खाली पडले आणि त्यांना इजा झाली आहे.

पित्याला अशा अवस्थेत पाहून श्रीकृष्णाचे मन व्याकुळ झाले. तो क्षणभर वास्तव विसरला, आणि त्या भीषण दृश्याने तो जागेवरच बेशुद्ध पडला. इतक्या सामर्थ्यवान नारायणाला ही ‘माया’ फसवू शकली, हेच त्या प्रसंगाचे वैशिष्ट्य आहे. थोड्या वेळाने श्रीकृष्णाला भान आले. त्याला कळले की हे सर्व राक्षसी माया आहे, सत्य नव्हे. त्यानंतर त्याने संपूर्ण शक्तीनिशी शाल्वावर प्रहार केला आणि त्याचे विमान उद्ध्वस्त करून त्याचा वध केला. ही कथा आपल्याला सांगते देवत्व असले तरी, मायेचा प्रभाव सर्वांवर पडू शकतो. परंतु सत्याचा प्रकाश शेवटी अंधारावर विजय मिळवतो.






