अखेर श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना संपूर्णपणे भगवान शंकराला समर्पित केला जातो. भारतातच नाही तर देशभरात अनेक ठिकाणी भगवान शंकराच्या भव्य मुर्त्या उभारण्यात आल्या आहेत. यात कोणकोणत्या देशांचा समावेश आहे, ते जाणून घ्या.
जगातील अनेक देशात भगवान शिवाच्या भव्य मुर्त्या स्थापित करण्यात आल्या आहेत
मॉरिशस - मॉरिशसच्या काही भागात देवी-देवतांची ,मंदिरे आहेत. येथील मंगल महादेवाची मूर्ती सुमारे 108 फूट उंच आहे. हिला पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक या ठिकाणी येत असतात
नेपाळ - नेपाळमधील काठमांडूमध्ये 144 फूट उंच महादेवांची मूर्ती आहे. कांठमांडूपासून काही अंतरावर असलेल्या या मूर्तीला कैलाशनाथ महादेव असे म्हटले जाते
हरिद्वार - हरिद्वारच्या गंगा घाटावर हर की पौरी शिव पुतळा स्थित आहे. ही मूर्ती भारतातील सर्वात उंच मूर्ती म्हणून ओळखली जाते
कर्नाटक - कर्नाटकात स्थित बेळगाव येथे 78 फूट उंच असलेली रामदुर्गमधील शिवाची ही मूर्ती देशातील भव्य मूर्ती म्हणूनही ओळखली जाते
कोईम्बतूर - कोईम्बतूरच्या वेल्लियांगिरी पर्वतावर स्थित भगवान शिवाच्या मूर्तीची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे