- जन्मानंतर आईने नाकारल्यामुळे चिमुकल्याला मायेपासून दूर राहावे लागले.
- इतर माकडांकडूनही स्वीकार न मिळाल्याने तो एकटा पडला.
- अखेरीस एका सॉफ्ट टॉयमध्ये त्याला मायेचा आणि आधाराचा स्पर्श मिळाला.
(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
हृदयस्पर्शी कहाणी व्हायरल होत असलेल्या या माकडाचं वय फक्त सहा महिने आहे. त्याची कहाणी हृदयद्रावक आहे, कारण त्याच्या स्वतःच्या आईने त्याला जन्मानंतर स्वाकारण्यास नकार दिला. व्हिडिओमध्ये हे लहान माकड त्याच्या आईच्या प्रेमाची आणि उबदारपणाची आस धरत असल्याचे दिसून आले आहे. तो प्रेमासाठी इतर माकडांकडेही जातो, पण त्याला फक्त फटकार आणि धक्काबुक्की मिळते. त्याच्या प्रियजनांपासून वेगळे झाल्यानंतर, या लहान माकडाला एका सॉफ्ट टॉयमध्ये मायेची ऊब मिळाली आहे. व्हिडिओत तो साॅफ्ट टाॅयला सतत बिलगून असल्याचे दिसते.
माहितीनुसार, या माकडाचा जन्म जन्म २६ जुलै २०२५ रोजी झाला. जन्मावेळी त्याचे वजन फक्त ५०० ग्रॅम होते. त्याची आई पहिल्यांदाच आई झाली होती. ती इतकी थकली होती की तणावात तिने तिच्या बाळाला दूर ढकलले. अनुभवाच्या अभावामुळे माकडांमध्ये हे वर्तन अनेकदा दिसून येते. माकडे सामान्यतः त्यांच्या बाळांना मिठी मारतात, परंतु या लहान माकडाच्या बाबतीत असे नव्हते. जेव्हा त्याची आई त्याला सोडून गेली, तेव्हा प्राणीसंग्रहालयाच्या काळजीवाहकांनी त्याला वाढवण्याची जबाबदारी घेतली. त्याला एकटे वाटू नये म्हणून त्यांनी त्याला टॉवेल आणि एक सॉफ्ट टॉय दिले. कोणीही कल्पना केली नव्हती की हे खेळणे त्याच्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनेल. तो रात्रीही ते घेऊन झोपतो.
🇯🇵🥹 In a Japanese zoo, baby monkey Panch, who had been clinging to a plush toy after being rejected by his mother, has finally found a real friend. Zookeepers had given him a plush orangutan to replace his mother, but now he has finally found a friend who truly cares for him. pic.twitter.com/GpgLULkB7T — Visegrád 24 (@visegrad24) February 18, 2026
शार्कच्या घोळक्यात मधोमध जाऊन अडकला ‘पाण्याचा दैत्य’, भयावह झाले दृष्य अन् घटनेचा Video Viral
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोक या माकडाला पाहण्यासाठी विशेषतः प्राणीसंग्रहालयात गर्दी करत आहेत. माकडाचा व्हिडिओही अनेक सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म्सवर ट्रेंड करत असून यूजर्स त्याची कहाणी पाहून भावूक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी सहन करू शकत नाही. तो किती लहान आणि एकटा आहे. त्याला स्वीकारले जात आहे याचा मला खूप आनंद आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की तो कधीही ते खेळणे फेकून देणार नाही ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्राण्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त करुणा असते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






