स्मृती ईराणीने आपला प्रवास सेल्सगर्ल पासून सुरू केला, त्यानंतर मॉडेलिंग, प्रसिद्ध अभिनेत्री ते धुरंदर राजकारणी असा येऊन पोहचला आहे. स्मृती इराणी हिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगने सुरु केली. १९९७ मध्ये फेमिना मिस इंडिया या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती.
तसेच या नंतर स्मृती ईराणी २००० साली स्टार प्लस वाहिनीवरील एकता कपूरच्या क्योकी सास भी कभी बहू थी या मालिकेमध्ये काम करताना दिसली. या मालिकेत स्मृती इराणीला साकारलेल्या भूमिकेसाठी भरपूर पुरस्कारसुद्धा मिळाले. तिने या मालिकेनंतर प्रचंड प्रसिद्धी अनुभवली. यानंतर स्मृती इराणी यांनी २००१ रोजी झुबीन इराणी यांच्या सोबत लग्न केले. यावेळी तिला निवडणुकीच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र स्मृतीचा चाहता वर्ग अजूनही कमी झालेला नाही. पाहा स्मृती ईराणीचे काही क्लासी लुक्स (फोटो सौजन्य – Instagram)
स्मृती इराणी १९९८ मध्ये मिका सिंगसोबत “सावन में लग गई आग ” अल्बमच्या बोलियां गाण्यांमध्ये दिसली होती. २००० मध्ये तिने टीव्ही मालिका आतिश आणि हम हैं कल आज और कल या मालिकेद्वारे तिच्या अभिनयाची सुरुवात केली. या दोन्ही मालिका स्टार प्लसवर प्रसिद्ध झाल्या होत्या.
तसेच स्मृती इराणीने २००२ मध्ये तिने झी टीव्हीवरील रामायण या मालिकेमध्ये सीता ही भूमिका साकारताना दिसली होती. यानंतर तिने 2008 मध्ये इराणी आणि साक्षी तन्वर यांनी ये है जलवा हा कार्यक्रम होस्ट केला. या अभिनयाच्याक्षेत्रात स्मृती इराणीने तिचा दर्जा वाढवला आणि तिला कमालीची प्रसिद्धी प्राप्त झाली.
स्मृती इराणी यानंतर राजकीय कारकिर्दीत पुढे आल्या त्या २००३ मध्ये भारतीय जनतापक्षात सामील झाल्या. आणि यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली आणि ती जिंकली
२०१४ रोजी स्मृती इराणीने लोकसभा निवडणुकांमध्ये अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधी विरुद्ध उभी राहिली. परंतु त्यानंतरही तिचा चाहता वर्ग कमी झाला नाही. तिने अनेक उत्तम कामं आणि लोकांची सेवा केली.
तसेच, नरेंद्र मोदी ह्यांच्या पंतप्रधानपदाखालील केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणीला मनुष्यबळ विकासमंत्री (Minister of Human Resource Development) हे कॅबिनेट दर्जाचे खाते मिळाले आहे.
यानंतर स्मृती इराणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदार संघातून काँगेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत केले. पुन्हा मोदी यांच्या मत्रिमंडळात महिला व बालविकास मंत्री , वस्त्रोद्योग मंत्री म्हणून स्मृती इराणी समावेश झाला. मात्र यावर्षी राहुल गांधी यांच्यासमोर ५ लाख मतांनी तिला पराभव पत्कारावा लागला.
यानंतर स्मृती इराणीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री म्हणूनअनेक निर्णय घेतले ज्यामुळे देशातील शिक्षणाची गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि परिणाम सुधारण्यास मदत झाली. तसेच पुढे स्मृती इराणीने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री (2016- 2021), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री( 2017- 2018), केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री अशी कारकीर्द तिने निर्माण करून भरपूर सुधारणा केली.