Nagpur Crime: नागपूरमध्ये नात्याला काळिमा! मामीला घरात एकटी पाहून फिरली नियत आणि…; भाचा अटकेत
कशी उघडकीस आली घटना?
या प्रकरणातील मृतकाचे नाव ज्योती (३५ वर्ष) असे आहे. तर तिची ६ वर्षाची मुलगी अशी आहे. ज्योती तिच्या पती सुदर्शनसोबत अली विहारमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होती. २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास सुदर्शन घरी पोहोचला, तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगी दोघीही गायब होत्या. तसेच त्यांच्या खोली अस्ताव्यस्त अवस्थेत होती. त्यावेळी त्यांना संशय आला आणि पतीने बेड बॉक्स उघडला. त्यांना त्यात पत्नी ज्योती आणि मुलीचा मृतदेह आढळला.
त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरु केला. प्राथमिक तपासात दोघींचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून तपासादरम्यान पोलिसांचा संशय त्याच इमारतीत राहणाऱ्या 35 वर्षीय दीनदयाल नावाच्या तरुणावर गेला. दीनदयाल हा मृत महिलेचा भाचा असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर तो फरार झाला होता आणि त्याचा मोबाईलही बंद असल्यामुळे त्याच्यावर संशय आणखी वाढला. पोलिसांनी आरोपीच्या शोधात बऱ्याच ठिकाणी छापे टाकले आणि त्याला अटक केली.
का केली हत्या?
आरोपी दीनदयाल हा पेशाने अकाउंटंट म्हणून काम करत होता. मृत महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. यादरम्यान. त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. महिलेच्या पजेसिव्ह वर्तनामुळे आरोपी वैतागला होता आणि याच गोष्टीमुळे संतापलेल्या आरोपीने रागाच्या भरात त्याने एवढे टोकाचे पाऊल उचलले.
कशी केली हत्या?
त्याने आधी ज्योतीची हत्या केली त्यांनतर तिच्या मुलीची हत्या केली. त्यांनतर त्यांचे मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवून तो घटनास्थळावरून फरार झाला. आरोपीची कठोर चौकशी करून आणखी काही समोर येत का याचा शोध घेतला जात आहे.
Kalyan Crime: आई-बाबा यापुढे मी…; बारावीच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
Ans: घरातील पलंगाच्या बेड बॉक्समध्ये आई आणि मुलीचे मृतदेह सापडले.
Ans: त्याच इमारतीत राहणाऱ्या 35 वर्षीय शेजाऱ्यावर संशय गेला.
Ans: तांत्रिक सर्व्हिलन्स आणि छाप्यांच्या मदतीने त्याची लोकेशन ट्रॅक करून अटक करण्यात आली.






