उन्हाळ्याच्या दिवसांत पंखे आणि एसीचा सर्वाधिक वापर केला जातो. पण पंखा आणि एसीच्या सततच्या वापरामुळे विजेचे बिल देखील वाढते. मात्र आता आम्ही तुम्हाला काही अशी टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही एसीचा वापर करून देखील विजेचे बिल वाढणार आहे. म्हणजेच आता तुमच्या घरात एसीमुळे वातावरण देखील थंड राहणार आहे आणि विजेच्या बिलाची चिंता करण्याची देखील गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया, या खास टिप्स. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: उन्हाळ्यात AC चा वापर करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, विजेचं बिल वाढणार नाही
एसीचा फ्लिटर खराब झाला असेल तर कुलिंग होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो आणि यामुळे तुमच्या विजेचं बिल वाढू शकतं. यासाठी सर्वात आधी एसीचा फिल्टर तपासून पाहा.
ac (5)
एयर कंडीशनरचे तापमान 23 ते 25 यांमध्ये ठेवा. यामुळे तुमचा एसी अगदी चांगल्या प्रकारे काम करतो.
एसीमध्ये टाईमरची सुविधा देखील दिली जाते, ज्यामुळे एसी ठरलेल्या वेळी आपोआप बंद होतो.
जर तुम्हाला एसी वापर करून विज बिल वाचवायचे असेल तर टाईमरची सुविधा अगदी उत्तम पर्याय आहे.
एसीचा वापर करताना पंखे सुरु ठेवा, ज्यामुळे लवकर कुलिंग होते आणि विजेची बचत होते.
एसीचा वापर करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा. दरवाजे उघडे ठेवल्यास एसीवर जोर पडतो.