मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते. मराठी सिनेमाची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी ही ग्लॅमर क्वीन आज पुन्हा तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. देशभरात सणासुदीचे वातावरण सुरु आहे. या निमित्ताने अनेक अभिनेते अभिनेत्री आपला नवा लुक चाहत्यांशी शेअर करत आहेत. दरम्यान, सोनालीनेही तिचा आकाशी रंगाच्या आऊटफिटमधला सुंदर आणि आकर्षक लुक शेअर केला आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केले फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)

मराठी सिनेसृष्टीमध्ये अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या सौंदर्याने गेले कित्येक वर्षे मराठी रसिकांच्या मनावर राज्य करीत आली आहे.

सोनालीने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याची जादूची छडी चाहत्यांवर चालवली आहे. या जादूने चाहत्यांचे मन घायाळ झाले आहे.

आकाशी रंगाचा घागरा, कानात झुमके आणि ओठांवर आकर्षक असे स्मितहास्य तिच्या सौंदर्याला चार चंद्र लावत आहेत.

अभिनेत्रीने तिचे फोटोज् तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. बहुतेक चाहत्यांनी या सौंदर्यवतीला अप्सरेची उपमा दिली आहे.

अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये तिने सांगितले आहे की," सणासुदीच्या दिवसात आकर्षक असे कपडे परिधान करणे मला फार आवडते."






