काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील ९ए, कोटला रोड येथील पक्षाच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले. गेल्या ४७ वर्षांपासून २४, अकबर रोड परिसरातील कार्यलयातून कामकाज सुरू होतं.
कसं आहे कॉंग्रेसचं नवीन कार्यालय भव्य 'इंदिरा भवन'
काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील ९ए, कोटला रोड येथील पक्षाच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले. गेल्या ४७ वर्षांपासून २४, अकबर रोड परिसरातील कार्यलयातून कामकाज सुरू होतं. नवीन कार्यालयाला इंदिरा भवन असं नाव देण्यात आलं आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यासह इतर वरिष्ठ पक्ष नेते उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
पक्षाच्या नेत्यांनी नवीन मुख्यालयात पक्षाचा ध्वज फडकावला आणि वंदे मातरम आणि राष्ट्रगीत गायले. त्यानंतर सोनिया गांधींनी इमारतीचे उद्घाटन केले आणि खरगे यांना इमारतीच्या प्रवेशद्वारावर रिबन कापून सहभागी होण्यास सांगितले.
"आपण काळानुसार पुढे जाण्याची आणि नवीन गोष्टी स्वीकारण्याची वेळ आली आहे," असे एआयसीसीचे संघटन सरचिटणीस वेणुगोपाल म्हणाले.
"ही प्रतिष्ठित इमारत काँग्रेस पक्षाच्या भविष्यकालीन दृष्टिकोनाचे प्रतिबिंबित करते, तर भारताच्या राजकीय आणि सामाजिक रचनेला आकार देणाऱ्या असाधारण भूतकाळाला सन्मान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
"नवी दिल्लीतील कोटला रोड, ९ए येथे स्थित, इंदिरा गांधी भवन हे पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, ज्यामध्ये प्रशासकीय, संघटनात्मक आणि धोरणात्मक उपक्रमांना समर्थन देण्यासाठी आधुनिक सुविधा आहेत.