सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. काम करण्याची सुद्धा अजिबात इच्छा होत नाही. सतत थकल्यासारखे वाटते. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, वारंवार उद्भवणाऱ्या अपचनाच्या त्रासामुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात या फळांचा समावेश करावा. फळांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून जाते आणि पोट व्यवस्थित स्वच्छ होते. (फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग नियमित न चुकता खा 'ही' गुणकारी फळे

सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन केळी खावी. यामध्ये असलेल्या फायबर आणि सोल्यूबल फायबर्समुळे आतड्यांमधील घाण मऊ होते आणि सहज बाहेर पडून जाते.

गोड चवीचा पेरू खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पेरूमध्ये विटामिन सी आणि उच्च फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येते.तसेच पेरू खाल्ल्यामुळे त्वचेवर चमकदार ग्लो येतो.

नियमित सकाळच्या नाश्त्यात एक सफरचंद खावे. आजारांपासून कायमच लांब राहण्यासाठी एक सफरचंद खावे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीर स्वच्छ होते.

ताजी किंवा सुकलेली अंजीर खाल्ल्यामुळे जुनाट बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळते. नियमित एक किंवा दोनच अंजीर खावे. यामुळे पोट स्वच्छ होते.

पपईमध्ये पपेन नावाचे पाचक एन्जाईम्सस आढळून येते, ज्यामुळे आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून जाते. आतडे आणि संपूर्ण शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी पपई खावी.






