सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात मोठी खळबळ उडाली आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेवर गंभीर आरोप करत तब्बल 35 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी एकत्रित राजीनामे दिले आहेत. आज पक्षाचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे झालेली स्वीकृत निवड प्रक्रिया पूर्णपणे चुकीची असल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “हा लढा तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आहे,” असे सांगत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला.पक्षासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तींना संधी देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय. “कार्यकर्त्यांनी फक्त कामच करत राहायचं का?” असा सवाल उपस्थित करत या निर्णयाचा निषेध करण्यात आला.सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी मध्ये कोणाला करायचे खुश आणि कोणाला करायचे नाराज हा प्रश्न भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षापुढे असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज होणार असल्याची शंका गेल्या आठवड्यामध्ये नवराष्ट्रने एक्सप्लेनरच्या माध्यमातून व्यक्त केली होती. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात मोठी राजकीय खळबळ निर्माण झाली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.