अभिनेत्री सुष्मिता सेनचा ५० वा वाढदिवस आहे. संपूर्ण जगभरातून तिच्या या विशेष दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सुष्मिता सेन म्हणजे जगभरातील अनेक तरुणांची ड्रीम गर्ल! ही ड्रीम गर्ल आता वयाच्या पन्नाशीतील वाढदिवस साजरी करत आहे, त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
फोटो सौजन्य - Social Media

अभिनेत्री सुष्मिता सेनने १९९४ मध्ये मिस युनिव्हर्स हा किताब पटकवला. इतकेच नव्हे तर ती हे किताब पटकवणारी पहिली भारतीय ठरली.

सुष्मिता सेनने दस्तक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिने अभिनेता शरद कपूर तसेच अभिनेता मुकुल देवसोबत काम केले आहे.

यानंतर 'Biwi No.1 (1999)', 'Sirf Tum (1999)', 'Aankhen (2002)', 'Main Hoon Na (2004)' तसेच Maine Pyaar Kyun Kiya? (2005) या सिनेमांमध्ये ती दिसून आली होती.

सुश्मिता सेनने 24 व्या वर्षी एकल मातृत्व स्वीकारले, तिने प्रथम तिची मुलगी Renee (2000 मध्ये) दत्तक घेतली.

सुश्मिता सेन अजून अविवाहित असून ती एक फाउंडेशनही चालवते.






