उन्हाळा वाढल्यानंतर शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात थंड पदार्थांचे सेवन केले जाते. थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते. या दिवसांमध्ये नारळ पाणी, लिंबू पाणी इत्यादी पेयांसोबतच कोकम सरबताचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. या सरबताचा सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले कोकम सरबत आणि कोकमाच्या बियांचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. आज आम्ही तुम्हाला कोकम सरबत प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या सरबताच्या सेवनामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते.(फोटो सौजन्य – iStock)
कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा कोकम सरबताचे सेवन
उन्हाळ्यात शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित कोकम सरबताचे सेवन करावे. कोकम सरबत प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारून पचनाचा त्रास होत नाही.
उन्हाळ्यात उष्माघात, डिहाड्रेशन सारख्या गंभीर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोकम सरबत प्यावे. कोकम सरबत प्यायल्यामुळे शरीरात पाण्याची पातळी वाढते.
कोकममध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स घटक मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी कोकम सरबत प्यावे.
उन्हात बाहेर फिरून आल्यानंतर बऱ्याचदा त्वचेमध्ये जळजळ होणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी थंडगार कोकम सरबत प्यावे.
कोकम सरबतमध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट्स शरीराला लगेच ऊर्जा मिळवून देतात. त्यामुळे थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागल्यास कोकम सरबत पिऊन तात्काळ आराम मिळवावा.