UN Human Rights: नरसंहार की राजकीय सूड?1400 लोकांची हत्येच पाप शेख हसिनांच्या माथी; UN बांगलादेशात खोदत आहे कबरी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Sheikh Hasina Genocide Accusation : बांगलादेशमध्ये (Bangladesh) सध्या युनूस सरकारने (हंगामी सरकार) एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित मानवाधिकार उल्लंघनाचे (Human Rights Violations) पुरावे गोळा करण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने ढाक्यातील रायरबाजार स्मशानभूमीत कबरींचे उत्खनन सुरू करण्यात आले आहे.
युनूस सरकारचा थेट आरोप आहे की, २००८ ते २०२४ या काळात शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आणि सैन्याने १,४०० हून अधिक लोकांना गुप्तपणे मारून सामूहिक कबरींमध्ये पुरले. विशेषतः, एका ठिकाणी १४० लोकांना पुरल्याचा दावा करण्यात आला आहे. हे उत्खनन त्याच बळींची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सुरू आहे.
या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी बांगलादेश सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे अर्जेंटिनाचे फॉरेन्सिक मानववंशशास्त्रज्ञ लुईस फोंडेब्रिडर (Luis Fondebrider) यांचा सल्ला घेतला आहे. फॉरेन्सिक अहवाल तयार करण्यात लुईस यांचा मोठा अनुभव आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संस्थेशी (UN Human Rights Body) झालेल्या करारानुसार त्यांना या कामासाठी पाचारण करण्यात आले आहे.
ढाका येथील चार प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांमधील फॉरेन्सिक तज्ञांची स्वतंत्र पथके उत्खननासाठी तैनात करण्यात आली आहेत, आणि या सर्व पथकांवर लुईस फोंडेब्रायडर लक्ष ठेवून आहेत. पत्रकारांशी बोलताना फोंडेब्रायडर म्हणाले, “ही प्रक्रिया गुंतागुंतीची आणि अद्वितीय आहे. हाडे पूर्णपणे कुजली असण्याची शक्यता असल्याने, मृतदेहांची ओळख पटवणे सोपे नसेल. तरीही, आम्ही आंतरराष्ट्रीय नियमांनुसार लोकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करू. यासाठी काही वेळ लागू शकतो.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : JD Busted : ‘तुम्ही उषाला भारतात पाठवा!’ Vance यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सोशल मीडियावर हल्ला; ‘ढोंगी’ म्हणून निषेध
हसीना यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित हत्यांसाठी त्यांच्यावर अनेक खटले सुरू आहेत आणि अलीकडेच त्यांना एका प्रकरणात दोषीही ठरवण्यात आले आहे. कबरींच्या उत्खननातून सापडलेल्या हाडांचा फॉरेन्सिक अहवाल तयार झाल्यावर, हंगामी सरकार हा अहवाल न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्याची दाट शक्यता आहे. हा अहवालच हसीना यांच्या अडचणीत मोठी वाढ करू शकतो आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या नरसंहाराच्या आरोपांना बळ देऊ शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Know your rights : ट्रम्प विरुद्ध न्यू यॉर्क मेयर ममदानी! 30 लाख स्थलांतरितांचे रक्षण करण्याचे दिले वचन, बचावाच्याही दिल्या टिप्स
हंगामी सरकारने आश्वासन दिले आहे की, उत्खनन केलेले मृतदेह नंतर धार्मिक रीतिरिवाजांनुसार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार पुन्हा दफन केले जातील. आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. बांगलादेशच्या भविष्यातील राजकारणावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या उत्खननाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Ans: शेख हसीना यांच्या कार्यकाळात मारल्या गेलेल्या शेकडो लोकांची ओळख पटवण्यासाठी.
Ans: संयुक्त राष्ट्रे (UN) आणि अर्जेंटिनाचे फॉरेन्सिक तज्ञ.
Ans: शेख हसीनांवरील हत्यांच्या खटल्यात पुरावा म्हणून सादर करण्यासाठी.






