इंस्टाग्रामप्रमाणेच फेसबुक देखील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक मानले जाते. फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणे, गप्पा मारणे, कंटेट पोस्ट आणि शेअर करणे यासाठीही फेसबुकचा वापर केला जातो. फेसबूकचे करोडो युजर्स आहेत. फेसबूक त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स रोलआऊट करत असतो. ज्यामुळे युजर्सना फेसबूकचा वापर करताना अधिक चांगला अनुभव येईल. या प्लॅटफॉर्ममध्ये अनेक लपलेली वैशिष्ट्ये आहेत, ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फीचरबद्दल सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला फेसबुकच्या अशा फीचर्सची माहिती देणार आहोत, जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. होय, या फीचरचा वापर करून तुम्ही चुकून डिलीट केलेल्या फेसबुक पोस्ट रिकव्हर करू शकता.(फोटो सौजन्य – Pinterest)
Facebook पोस्ट डिलीट झाल्या? चिंता नको! फक्त फॉलो करा या स्टेप्स आणि क्षणात रिस्टोअर होतील तुमचे फोटो
अनेक वेळा असे होते की आपल्याला दुसरी पोस्ट डिलीट करायची असते. पण घाईघाईत दुसरीच पोस्ट डिलीट होते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची डिलीट केलेली पोस्ट रिकव्हर करू शकता. चला तर मग आपण फेसबुकवर चुकून डिलीट झालेल्या फेसबुक पोस्ट्स कशा रिस्टोअर करू शकता ते जाणून घेऊया.
सर्व प्रथम तुमचे फेसबुक अकाऊंट ओपन करा. आता Facebook मधील तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा.
प्रोफाइल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन डॉट दिसतील, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर 'Settings And Privacy' वर क्लिक करा.
'सेटिंग्स अँड प्रायव्हसी' ऑप्शनवर जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा सेटिंग्ज ऑप्शनवर जावे लागेल. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटी विभागात जावे लागेल.
आता Activity Log वर क्लिक करा. या विभागात तुम्हाला तुम्ही अलीकडे डिलीट केलेल्या सर्व पोस्ट दिसतील.
आता तुमच्या डिलीट केलेल्या पोस्टवर क्लिक करा आणि जवळपास दिसणाऱ्या 'Restore' पर्यायावर क्लिक करा.
अशाप्रकारे, तुम्ही चुकून हटवलेल्या पोस्ट सहजपणे रिस्टोअर करू शकता आणि यासाठी तुम्हाला वेगळे थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करण्याचीही गरज नाही.