आजच्या काळात स्मार्ट टीव्ही खरेदी करणे ही मोठी गोष्ट नाही, बाजारात इतके पर्याय उपलब्ध आहेत की तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. पण तरीही जर तुम्ही नवीन स्मार्ट टिव्ही खरेदी करताना गोंधळलेले असाल आणि कोणता स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा हे ठरवू शकत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत, ज्यामुळे नवीन स्मार्ट टिव्ही खरेदी करताना तुम्ही गोंधळणार नाही. स्मार्ट टिव्ही खरेदी करताना स्क्रीनचा आकार, रिझोल्यूशन, पॅनेल प्रकार, रिफ्रेश रेट, स्मार्ट फीचर्स, यासांरख्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: Smart TV खरेदी करताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर पश्चाताप कराल
स्क्रीनचा आकार: टीव्हीच्या स्क्रीनचा आकार तुमच्या खोलीच्या आकारावर आणि तुम्ही टीव्ही पाहत असलेल्या अंतरावर अवलंबून असतो. मोठ्या खोल्यांसाठी, 55 इंचापेक्षा मोठी स्क्रीन योग्य मानली जाते आणि लहान खोल्यांसाठी, 32 ते 50 इंचांमधील स्क्रीन योग्य मानली जाते.
रिझोल्यूशन: उच्च दर्जाचा मनोरंजन अनुभव मिळविण्यासाठी किमान 4K रिझोल्यूशन असलेला टीव्ही निवडा. 4K मध्ये उच्च पिक्सेल डेंसिटी असते, ज्यामुळे चित्र आणि व्हिडिओची गुणवत्ता चांगली होते.
पॅनेल प्रकार: LED, OLED किंवा क्वांटम डॉट - प्रत्येक पॅनेलचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. ओलिओडची गुणवत्ता सर्वोत्तम म्हणता येईल पण ती महाग आहे. एलईडी हा एक चांगला बजेट पर्याय आहे, तर क्वांटम डॉट चमकदार रंग आणि उच्च कॉन्ट्रास्ट देते.
रिफ्रेश रेट: उच्च रिफ्रेश रेट (120 हर्ट्झ किंवा त्याहून अधिक) सहज हालचाल आणि चांगला गेमिंग अनुभव प्रदान करतो.
स्मार्ट फीचर्स: बहुतेक नवीनतम टीव्ही अॅप्स, व्हॉइस असिस्टंट आणि स्ट्रीमिंग सेवांसारख्या स्मार्ट फीचर्सना सपोर्ट करतात. तुमच्या आवडत्या स्ट्रीमिंग सेवा आणि अॅप्स इन्स्टॉल केलेला टीव्ही निवडा, तसेच भविष्यात नवीन अॅप्स इन्स्टॉल करण्यासाठी स्टोअर निवडा.
कनेक्टिव्हिटी: टीव्ही खरेदी करताना, HDMI पोर्ट, USB पोर्ट आणि वाय-फाय आणि ब्लूटूथ सारखे वायरलेस कनेक्टिव्हिटी पर्याय तपासा. तसेच, तुम्ही टीव्ही वेगवेगळ्या उपकरणांशी कनेक्ट करू शकता याची खात्री करा.